तानाजी सावंत नाराज ? ठाकरेंच्या आदेशानंतरही शिवसंपर्क अभियानात गैरहजेरी

'मातोश्री'हून येणारे आदेश पाळतो म्हणणारे आमदार सावंत शिवसंपर्क अभियानामध्ये फिरकले नाही. त्यामुळे त्यांची भूमिका संशयास्पद असल्याची चर्चा शिवसैनिकांमध्ये होत आहे.
Tanaji Sawant And Uddhav Thackeray
Tanaji Sawant And Uddhav Thackerayesakal

उस्मानाबाद : शिवसंपर्क अभियानाला संपर्कप्रमुखांनीच जिल्ह्यात दांडी मारली आहे. त्यामुळे संपर्कप्रमुख आमदार तानाजी सावंत यांच्या भूमिकेवर पुन्हा एकदा शिवसैनिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत? मातोश्रीहून येणारे आदेश पाळतो म्हणणारे आमदार सावंत शिवसंपर्क अभियानामध्ये फिरकले नसल्याने त्यांची भूमिका संशयास्पद असल्याची चर्चा शिवसैनिकांमध्ये होत आहे. याबाबत आमदार तानाजी सावंत यांच्याकडे संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी फोन स्विकारला नाही. सामान्य माणसाचे प्रश्न काय आहेत ? ते जाणून घेणे, ते सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत. यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शिवसंपर्क अभियान राबवण्याचे आदेश शिवसेना (Shiv Sena) पक्षप्रमुख यांनी मातोश्रीवर दिले. (Tanaji Sawant Absent For Shiv Sampark Abhiyan In Osmanabad)

Tanaji Sawant And Uddhav Thackeray
Hingoli | हिंगोलीत पोलिसांची मोठी कारवाई, जिलेटीन अन् डिटोनेटर जप्त

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी याबाबत सूचना केल्यानंतर शहरी भागातील प्रत्येक वॉर्ड तसेच ग्रामीण भागातील प्रत्येक पंचायत समिती गणांमध्ये जाऊन सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी संपर्क करण्यास सुरवात केली. उस्मानाबाद (Osmanabad) जिल्ह्यात खासदार सदाशिव लोखंडे (Sadashiv Lokhande) यांच्याकडे मार्गदर्शक म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. त्या अनुषंगाने खासदार लोखंडे यांनी जिल्ह्यातील उस्मानाबाद, तुळजापूर, लोहारा, उमरगा, कळंब या तालुक्यांमध्ये हजेरी लावून शिवसंपर्क अभियान राबविले. जिल्ह्याचे संपर्क प्रमुख म्हणून त्यांच्यासोबत आमदार तानाजी सावंत असणे अपेक्षित होते. मात्र जिल्ह्यातील कोणत्याच कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली नाही. विशेष म्हणजे खासदार लोखंडे परंडा मतदारसंघात हे अभियान राबविताना सहकार्यही झाले नसल्याचे शिवसैनिक दबक्या आवाजात बोलत आहेत. त्यामुळे शिवसंपर्क अभियानातून आमदार सावंत यांचा संपर्क केव्हाच तुटला असल्याची चर्चा शिवसैनिकांमध्ये होत आहे.

Tanaji Sawant And Uddhav Thackeray
लक्षणे नसताना चीनचे नागरिक होतायत कोरोनाबाधित, शांघायमध्ये लाॅकडाऊन

महाविकास आघाडीच्या सरकारला अडीच वर्षे पूर्ण होत आहेत. मात्र अडीच वर्षापूर्वी मंत्रीपद न मिळाल्याने आमदार सावंत यांची भूमिका कायमच संशयाच्या भोवर्‍यात उभी राहिली. कधी स्वपक्षातील नेत्यावर तर कधी महाविकास आघाडीतील नेत्यावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष त्यांनी टीका केली. या शिवाय जिल्हा परिषदेतील सत्ता समीकरणात भाजपसोबत हातमिळवणी केली. यामध्ये पुतण्याला उपाध्यक्ष म्हणूनही संधी दिली. शिवसेनेला त्रासदायक ठरणाऱ्या त्यांच्या पवित्र्याने जिल्ह्यातील शिवसैनिक पुरते हैराण झाले. आपण केवळ मातोश्रीचे आदेश पाळतो म्हणणारे आमदार तानाजी सावंत (Tanaji Sawant) शिवसंपर्क अभियानामध्ये मात्र दिसले नाहीत. विशेष म्हणजे त्यांच्या मतदारसंघात तर शिवसंपर्क अभियान अगदी एक-दोन ठिकाणी पाहायला मिळालं. शहरी भागातील प्रत्येक वॉर्ड अथवा जिल्हा परिषदेच्या गणांपर्यंत जाऊन पक्षाची आणि सरकारची भूमिका मांडवी अशा सूचना मातोश्रीवरून आल्या होत्या.

Tanaji Sawant And Uddhav Thackeray
महाआघाडी विरुद्ध भाजप संघर्ष पेटणार; MLA ठाकूरांना मोठा धक्का

मात्र मातोश्रीच्या या अभियानाला कोलदांडा केल्याने आमदार सावंत यांची भूमिका पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पक्षाकडून एकवेळा मंत्रीपद, सध्या आमदारकी, पुतण्या जिल्हा परिषद उपाध्यक्ष, मुलगा जिल्हा बँकेत संचालक अशा विविध पातळ्यावर पक्षाकडून संधी देण्यात आली आहे. असे असतानाही जर पक्ष कार्यासाठी मातोश्रीचा आदेश मानला जात नसेल तर अशा नेत्यांचा पक्षाला काय उपयोग ? अशी भावना शिवसैनिक बोलून दाखवत आहेत. आता पुढील काळात आमदार सावंत काय भूमिका घेतात, याकडे जिल्ह्यातील शिवसैनिकांचे लक्ष असणार आहे. दरम्यान याबाबात आमदार सावंत यांच्याशी सपर्क केला. मात्र त्यांनी फोन स्विकारला नाही. शिवाय त्यांचे पुतणे तथा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांनाही संपर्क केला. मात्र त्यांनीही प्रतिसाद दिला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com