तनिष्कांची निवडणुकीसाठी तयारी सुरू

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 सप्टेंबर 2016

औरंगाबाद - "तनिष्का‘ व्यासपीठाअंतर्गत ऑक्‍टोबरमध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी सदस्या तयारीला लागल्या आहेत. निवडणूक प्रक्रियेसाठी आपापल्या "तनिष्का‘ गटाच्या बैठकी आयोजित केल्या आहेत. संपूर्ण मराठवाड्यातील "तनिष्का‘ सदस्यांसह गृहिणी, नोकरदार, व्यावसायिक तसेच अन्य क्षेत्रांतील महिलांमध्ये निवडणुकीबाबत प्रचंड उत्सुकता आहे. 

औरंगाबाद - "तनिष्का‘ व्यासपीठाअंतर्गत ऑक्‍टोबरमध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी सदस्या तयारीला लागल्या आहेत. निवडणूक प्रक्रियेसाठी आपापल्या "तनिष्का‘ गटाच्या बैठकी आयोजित केल्या आहेत. संपूर्ण मराठवाड्यातील "तनिष्का‘ सदस्यांसह गृहिणी, नोकरदार, व्यावसायिक तसेच अन्य क्षेत्रांतील महिलांमध्ये निवडणुकीबाबत प्रचंड उत्सुकता आहे. 

औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यांत सुमारे साठ ठिकाणी "तनिष्कां‘च्या निवडणुका येत्या 15 आणि 16 ऑक्‍टोबर रोजी होत आहेत. "तनिष्का‘ सदस्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे अजूनही मतदान केंद्रांची, गावांची संख्या वाढण्याची शक्‍यता आहे. निवडणुकीत सहभागासाठी कॉल सेंटरचा क्रमांक 9225800800 असा आहे.

मतदान केंद्रांचा तपशील असा ः
मतदान ः 15 ऑक्‍टोबर ः औरंगाबाद जिल्हा ः औरंगाबाद शहर, पैठण तालुका ः पैठण शहर, विहामांडवा, पिंपळवाडी, वाहेगाव, लोहगाव, वैजापूर तालुका ः पालखेड, कापूस वाडगाव, शिऊर, खुलताबाद तालुका ः खुलताबाद शहर, शुलिभंजन, बाजारसावंगी, सिल्लोड तालुका ः सिल्लोड शहर, सारोळा, घाटनांद्रा, शिवना.
 

जालना जिल्हा ः जालना शहर, अंबड तालुका ः अंबड शहर, सुखापुरी, जामखेड, रोहिलागड, बदनापूर ः बदनापूर शहर, बुटेगाव, भोकरदन तालुका ः भोकरदन शहर, वालसावंगी, जवखेडा, घनसावंगी तालुका ः घनसावंगी शहर, तीर्थपुरी, जांब समर्थ, खालापुरी, रांजणी, जाफराबाद तालुका ः जाफराबाद शहर, मंठा तालुका ः मंठा शहर, तळणी, परतूर तालुका ः परतूर शहर, आष्टी.

मतदान ः 16 ऑक्‍टोबर ः औरंगाबाद जिल्हा ः औरंगाबाद तालुका ः माळीवाडा, कुंभेफळ - शेंद्रा, लाडसावंगी, गंगापूर तालुका ः गंगापूर शहर, कायगाव, लासूर स्टेशन, शेंदूरवादा, कन्नड तालुका ः नागद, नाचनवेल, आंबा तांडा.
 

जालना जिल्हा ः अंबड तालुका ः आलमगाव, बदनापूर तालुका ः उज्जैनपुरी, पठार देऊळगाव, भोकरदन तालुका ः थोटे पिंपळगाव, जाफराबाद तालुका ः शिराळा, देळेगव्हाण, माहोरा, जालना तालुका ः नंदापूर, नसडगाव, मंठा तालुका ः खोरडसावंगी, पांगरी गोसावी, परतूर तालुका ः वाटूर फाटा, सातोना

Web Title: Tanishka start preparing for elections