esakal | टँकरमधून जालन्याहून निघालेले नांदेडात अडकले
sakal

बोलून बातमी शोधा

फोटो

२० विद्यार्थी त्यात दोन विद्यार्थीनी अतिशय हिम्मत करुन रिकाम्या पाण्याच्या टॅकंरमधून तेलंगनाकडे निघाले. मात्र हे टॅकर नांदेडात येताच पोलिसांनी तपासणी केली असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला व त्यांना ताब्यात घेतले

टँकरमधून जालन्याहून निघालेले नांदेडात अडकले

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : जालना येथील एका कृषी कंपनीत प्रशिक्षणासाठी आलेले २० विद्यार्थी त्यात दोन विद्यार्थीनी अतिशय हिम्मत करुन रिकाम्या पाण्याच्या टॅकंरमधून तेलंगनाकडे निघाले. मात्र हे टॅकर नांदेडात येताच पोलिसांनी तपासणी केली असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला व त्यांना ताब्यात घेतले. त्या ठिकाणी बघ्यांची गर्दी झाली होती. पोटात अन्नाचा कन नसलेले हे सर्वजण भुकेने व्याकुळ झालेले होते. त्यांना बोलतासुद्धआ येत नसल्याने त्यांना पोलिसांनी धीर दिला. 

लॉकडाऊन काळात आपले गाव गाठण्यासाठी अनेकांना ओढ लागली आहे. त्यामुळे वाटेल त्या वाहनातून सापडेल त्या मार्गाने गावाकडे निघणाऱ्या असंख्य नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. तेलंगणातील २० जणांनी आपले गाव गाठण्यासाठी चक्क टँकरमधून प्रवास सुरू केला, मात्र हे टँकर नांदेड पोलिसांनी पावडे पेट्रोल पंपासमोर अडवून यातील २० जणांना ताब्यात घेतले आहे. ही घटना शनिवारी (ता. २५) पहाटे उघडकीस आली. ताब्यात घेतलेल्या व्यक्तींमध्ये १८ तरुण आणि दोन तरुणींचा समावेश आहे

हेही वाचा - नांदेडच्या ‘कंटेंटमेंट झोन’वर प्रशासनाचे लक्ष...

सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल भोसले यांची तत्परता

तेलंगणातील २० जन जालन्यात एका कृषी कंपनीत प्रशिक्षणासाठी गेल्या दोन महिन्यापासून कार्यरत होते.  काकीनाडा, राजमुंद्री, विजयवाडा, गुडुर येथील तरुण- तरुणीचा यात समावेश आहे. लॉकडाऊनला वैतागलेल्या २० जणांनी ( MP- 0- HG-3457) नंबर असलेल्या या टँकरमधून  गाव गाठण्याचं ठरवलं होतं. त्यानुसार रात्री टँकरमधून प्रवास सुरू केला. गुदमरून मृत्यू येवू नये यासाठी टँकरचे झाकण खुले ठेवण्यात आले होते. जालन्यातून निघालेला हा टँकर पावडे पेट्रोल पंपाजवळ गस्तीवर असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल भोसले यांनी अडवला.

धोकादायक टॅंकरचा प्रवास

टँकर अडवल्यानंतर पोलिसांनी चालकाकडे कुठे आणि कशासाठी चालला अशी विचारणा केली. चालक उडवाउडवीची उत्तर देत असल्याचं लक्षात येताच पोलिसांना संशय बळावला. पोलिसांनी टँकरची झडती घेतली असता टँकरमधून २० जण प्रवास करत असल्याचे उघड झाले. लॉकडाऊन काळात आमच्याकडील पैसे संपले आहेत. खाण्याचा व राहण्याचा प्रश्न गंभीर झाला असल्याने आम्ही हे धाडस केल्याचे त्या तरुणांनी कबुल केले. यावेळी पोलिसांनी टॅंकर चालकाला ताब्यात घेतले आहे.

येथे क्लिक करादेगलूरच्या त्या १९ गावांचा खंडीत वीजपुरवठा सुरु

विचारपूस करून अल्पोपहाराची व्यवस्था 

या सर्वांना घेऊन सहाय्यक पोलिस निरीक्षक विशाल भोसले यांनी भाग्यनगर पोलिस ठाण्यात आले. तेथे त्यांची विचारपूस करून अल्पोपहाराची व्यवस्था केली. लॉकडाऊनचा अंदाज येत नसल्याने आम्ही काय खायायचे म्हणून हा धाडशी निर्णय घेतल्याचे हे प्रशिक्षणार्थी विद्यार्थी बोलत होते. त्यांच्या चेहऱ्यावर भितीचे वातावरण दिसत होते. या सर्वांना जिल्हाधिकारी यांच्यासमोर हजर कऱण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.