दोन्ही तपोवन एक्स्प्रेस रद्द, नंदीग्राम नाशिकहून सुटणार 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 जुलै 2019

विशेषत: नांदेड मुंबई नांदेड दरम्यान धावणारी तपोवन एक्स्प्रेस आज नांदेडला येऊ शकणार नाही. तसेच नांदेडहून मुंबईला जाऊही शकणार नाही. या दोन्ही गाड्या रद्द करण्यात आल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वेकडून देण्यात आली. 

नांदेड : मुंबई परिसरात होत असलेल्या जोरदार पावसामुळे आणि काल (ता. १) मुंबई-पुणे दरम्यान झालेल्या मालगाडीच्या अपघातामुळे अनेक गाड्यांवर परिणाम झाला आहे.

विशेषत: नांदेड मुंबई नांदेड दरम्यान धावणारी तपोवन एक्स्प्रेस आज नांदेडला येऊ शकणार नाही. तसेच नांदेडहून मुंबईला जाऊही शकणार नाही. या दोन्ही गाड्या रद्द करण्यात आल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वेकडून देण्यात आली. 

दमरेच्या नांदेड विभागाच्या जनसंपर्क विभागाने कळविल्यानुसार आज (ता. २) सुटणाऱ्या मुंबई-नांदेड-मुंबई तपोवन एक्सप्रेस या दोन्ही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच १ जुलै रोजी सुटलेली नागपूर-मुंबई नंदीग्राम एक्स्प्रेस नाशिकपर्यंतच धावेल आणि ता. २ जुलैला सुटणारी मुंबई ते नागपूर नंदीग्राम एक्स्प्रेस नाशिक येथूनच सुटेल. 
प्रवाश्यांना होणाऱ्या असुविधेबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगीर व्यक्त केली आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: tapovan express cancelled and Nandigram express diverted in Nanded