डांबर गैरव्यवहारातील आरोपींच्या कोठडीत वाढ

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 फेब्रुवारी 2019

नांदेड - येथील सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत कोट्यवधींचा डांबर गैरव्यवहार करणारा कंत्राटदार सी. एस. संत्रे याला न्यायालयासमोर हजर केल्यानंतर त्याच्या पोलिस कोठडीत सोमवारपर्यंत (ता. 11) वाढ करण्यात आली आहे.

रस्ते देखभाल दुरुस्तीच्या कामांचे कंत्राट शासकीय सहा बड्या कंत्राटदारांना मिळाले होते. कंत्राटदारांना एचपीसीएल कंपनीकडून डांबर खरेदी करण्याच्या सूचना निविदेमध्ये होत्या. शासकीय कामांसाठी या कंपनीकडूनच डांबर खरेदी करणे अपेक्षित असताना कंत्राटदार मनोज मोरे, भास्कर कोंडा, सतीश देशमुख, सी. एस. संत्रे, मोईज करखेलीकर आणि साईनाथ पद्मावार यांनी निकृष्ट डांबर खरेदी केले. परंतु ते एचपीसीएल कंपनीकडूनच खरेदी केल्याच्या बनावट पावत्या तयार करून सुमारे 11 कोटी 83 लाख रुपये उचलून अपहार केला.

Web Title: Tar scam Accused Police Custody Crime