
बाहेर जिल्ह्यातून आलेल्या ७७ हजार ६७७ व्यक्तींना क्वाॅरंटाईन करण्यात आले आहे. ग्रामीण भागात ताप सद्रश्य लक्षणांची व सारी सदृश्य आजाराचे नियमित सर्वेक्षण करण्यात येत आहे.
नांदेड : कोरना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. देशभरात लाॅकडाउन कालावधीत खबरदारीच्या उपाय योजनांसाठी निर्बंध जारी करण्यात आले आहेत. जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य सभापती पद्मा सतपलवार, जिल्हा आरोग्य आधिकारी यांच्या मार्गदशनाखाली टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे.
कोरोना विषाणूचा वाढता प्रभाव लक्षात घेता प्रशासनाने जिल्ह्यात लाॅकडाउन कालावधीत खबरदारीच्या उपाय योजनांवर अधिक भर दिला आहे. राज्य शासनाच्या सुचनांचे यंत्रणेकडून काटेकोर पालन करण्यात येत आहे. जिल्ह्यात बाहेरून येणाऱ्या नागरिकांना प्रवेश बंदी केली आहे. शिवाय तेलंगणा, कर्नाटक, विदर्भ सीमाही बंद करण्यात आल्या आहेत. जिल्हा आरोग्य विभागामार्फत दररोज कोविड १९ चर्चा अनुषंगाने ग्रह भेटीद्वारे सर्वेक्षण केले जात आहे.
हेही वाचा - महत्त्वाची बातमी : न्यायमूर्ती म्हणतात....वृत्तपत्र स्वातंत्र्यावर गदा आणता येणार नाही
बल्क एसएमएसही पाठविले जातात
सर्व कर्मचारी मुख्यालयी राहून आपले कर्तव्य बजावत आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे प्रत्यक्ष सीमावर्ती भागाच्या दौऱ्यात मार्गदर्शक सूचना देत आहेत. राज्यात करोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता जिल्हाभरात टास्क फोर्स स्थापन करण्यात आले आहे. ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र स्तरावर आरोग्य यंत्रणा सतर्क आहे. होम क्वाॅरंटाईन केलेल्या व्यक्तींना नियमित पूर्ण भेट देऊन त्यांचे आरोग्य विषयक समुपदेशन केले जात आहे. तसेच ताप सद्रश्य लक्षणांच्या रुग्णांना संदर्भसेवा लेबर कॅम्प ठिकाणी असलेल्या मजूर व इतर व्यक्तींसाठी नियमित आरोग्य तपासणी, योग मेडिटेशन, विपश्यना, मानसिक आरोग्यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शन करत आहेत. शिवाय बल्क एसएमएसही पाठवला जात आहे.
हे देखील वाचाच - पालकमंत्री अशोक चव्हाण नांदेडला ठाण मांडून...
ग्रामस्तरावर नागरिकांचे समुपदेशन
जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात परराज्यातून येणाऱ्या व्यक्तींची तपासणी करून त्यांना घरातच क्वाॅरंटाईनचा सल्ला दिला जात आहे. ग्रामस्तरावरील दक्षता समिती मार्फत होमक्वाॅरंटाईन केलेल्या व्यक्तींचा आरोग्याबाबत आढावा घेतला जातो. त्याचबरोबर सर्व गावांमध्ये औषधी फवारणीची कार्यवाही नियमित केली जात आहे. ग्रामस्तरावर मास्क, सोशल डिस्टन्स हँड टायझर, हँडवाॅशचा नियमित वापर करण्याबाबत समुपदेशन करण्यात येत आहे . कोरोना विषाणूचा जिल्ह्यात प्रादुर्भाव वाढू नये, संसर्ग साखळी खंडित करण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत.
डेडिकेटेड कोविद हॉस्पीटल्स
जिल्ह्यात एकूण २० कोविद केअर सेंटर जिल्हा व तालुकास्तरावर कार्यान्वित आहेत. याठीकाणी तीन हजार ५० खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. संशयित व सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांवर येथे उपचार केले जात आहेत.
येथे क्लिक करा - VIDEO : ‘कोरोना’चा संसर्ग पाहून दिव्यांगाचे गहरविले मन
जिल्हास्तर आयुर्वेद रुग्णालय व गुरुगोविंद सिंग स्मारक रुग्णालय याशिवाय हदगाव ,देगलूर ,किनवट ,अर्धापूर व लोहा येथे डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर ची स्थापना करण्यात आली आहे. याठिकाणी ४८० खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय , जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय मुखेड शिवाय शहरातील ग्लोबल हॉस्पिटल , यसोसाई हॉस्पिटल , अभ्युदय लाईफ केअर हॉस्पिटल , संजीवनी हॉस्पिटल , नंदिग्राम हॉस्पिटल , अश्विनी हॉस्पिटल , याठिकाणी ७७० खाटांसह डेडिकेटेड कोविद हॉस्पिटल तयार करण्यात आले आहे.