टाकळी खुर्द येथे शिक्षकाची आत्महत्या

नामदेव कन्हीराम दधरे
नामदेव कन्हीराम दधरे


नाचनवेल (जि.औरंगाबाद) ः टाकळी खुर्द (ता.सिल्लोड) येथील शिक्षकाने आडगाव शिवारात विषारी औषधासह दारू प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (ता.30) दुपारी उघडकीस आली. आत्महत्या केलेल्याचे नामदेव कन्हीराम दधरे (वय 45) असे नाव आहे. दधरे हे डेरेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सहशिक्षक होते. याप्रकरणी पिशोर पोलिस ठाण्यात पंचनामा करून गुन्हा दाखल करून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.


दुधरे गुरुवारी (ता.29) शाळा सुटल्यानंतर घरी परतले नाही. म्हणून कुटुंबासह नातेवाइकांनी शोध सुरू केला होता. यादरम्यान, शुक्रवारी (ता.30) आडगाव शिवारातील वनीकरण विभागाच्या क्षेत्रात सकाळी दहा-अकराच्या सुमारास गुरे चारणाऱ्यास मृतदेह आढळून आला. त्यांनी ही बाब ग्रामस्थांना कळविली. या घटनेची पोलिस पाटील रामेश्वर वाघ यांनी पिशोर पोलिस ठाण्यात माहिती दिली. यावेळी पोलिस उपनिरीक्षक एन.वाय.अंतरप, जमादार अरुण गाडेकर, नितीन जाधव व शिवदास बोराडे आदींनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी करून पंचनामा केला.


मृतदेह नाचनवेल प्राथमिक आरोग्य केंद्रात आणला. सायंकाळी सहाच्या सुमारास उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. रात्री उशिरा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्‍चात आई, पत्नी, दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. त्यामुळे पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून जंगलात आणलेली दुचाकी (एमएच-20, डीएम-2911) ताब्यात घेऊन पोलिस तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com