शिक्षकाच्‍या बदलीनंतर गढाळ्यात चूल पेटलीच नाही

मंगेश शेवाळकर
मंगळवार, 29 मे 2018

हिंगोली : मागील आठ वर्षापासून विद्यार्थ्यांचा शाळेतच मुक्‍काम, चोवीस तास शाळेचे कुलूप उघडलेलेच, दिवसरात्र विद्यार्थ्यांची गजबज, या परिस्‍थितीत वावरणाऱ्या औंढा तालुक्‍यातील गढाळा येथील विद्यार्थी व गावकऱ्यांना शिक्षकांची झालेली बदली चटका लावून गेली. बदलीचे वृत्त कळाल्‍यानंतर सोमवारी (ता.२८) रात्री गावात चूल पेटलीच नाही.

औंढा तालुक्‍यातील गढाळा येथे पाचवीपर्यंत शाळा असून उत्तमराव वानखेडे, सिद्धेश्वर रणखांब, रोहिणी कलवरकर हे शिक्षक कार्यरत आहेत. शाळेतील ८५ विद्यार्थ्यांना जागा अपुरी पडत असल्‍याने एक वर्ग मंदिरात भरतो. मागील आठ वर्षापासून या शाळेला कधीही कुलूप लागले नाही. शैक्षणिक वर्षासह उन्‍हाळी सुट्टीतही शाळा सुरुच असते. 

या गावातील बहुतांश गावकरी मजुरी करत असून अर्ध्यापेक्षा अधिक गावकरी मजुरीसाठी बाहेरगावी जातात. त्‍यामुळे हे विद्यार्थी शिक्षकांच्‍या स्‍वाधीन असतात. शंभर टक्‍के गुणवत्ता असलेल्‍या या शाळेतील शिक्षक उत्तम रणखांब यांची बदली झाली आहे. श्री. रणखांब यांची बदली झाल्‍याचे कळताच गावकऱ्यांसह विद्यार्थीही हळहळले. सोमवारी रात्री एकाही गावकऱ्यासोबत विद्यार्थ्यांनी जेवणही केले नाही. कसेही करून गुरुजी तुमची बदली रद्द करा अशी विनवणी गावकरी करू लागले आहेत. गावकरी व विद्यार्थ्याची परिस्‍थिती पाहून श्री. रणखांब यांनी मंगळवारी (ता.२९) गावात जाण्याचे टाळले. 

विद्यार्थ्यांचा आधार काढू नका - संतोष खंदारे
शाळेतील तिन्‍ही शिक्षक विद्यार्थ्यांचा आधार आहे. विद्यार्थी घरी कमी व शाळेत जास्‍त राहतात. श्री. रणखांब यांच्‍या बदलीमुळे विद्यार्थ्यासह गावकऱ्यांचे चेहरे रडविले झाले आहे. विद्यार्थ्यांचा आधार काढू नका अशी मागणी शासनाकडे करणार आहोत.

Web Title: teacher transfer issue in hingoli

टॅग्स