‘त्या’ शिक्षकांचे बिंग फुटणार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 ऑगस्ट 2018

उस्मानाबाद - शिक्षण विभागाने केलेल्या शिक्षक ऑनलाइन बदली प्रक्रिया तपासणीचा अहवाल सोमवारपर्यंत (ता. २०) येण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. हा अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर चुकीची माहिती देणाऱ्या गुरुजींवर कारवाई होणार असल्याने शिक्षणक्षेत्रात खळबळ उडाली आहे. काही प्रमाणपत्रांमुळे ही यादी प्रसिद्ध करण्यास विलंब होत असल्याचे सांगण्यात येत आहे. चौकशी अहवाल सादर केल्यानंतर त्यामध्ये निघालेल्या काही त्रुटी दूर करून येत्या सोमवारपर्यंत (ता.२०) यादी जाहीर होईल असे चित्र आहे.

जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या संवर्गानुसार ऑनलाइन बदलीची प्रक्रिया पार पडली. या प्रक्रियेमध्ये काही जणांनी खोटी माहिती देऊन इच्छितस्थळी बदली करून घेतल्याचे आरोप झाले होते. ही प्रक्रिया ऑनलाइन असल्याने स्थानिक पातळीवर त्याची काहीच माहिती नव्हती, दिलेल्या संकेतस्थळावर शिक्षकांनी स्वतःचे अर्ज केले होते, त्यामध्ये त्यांनी दिलेली माहिती खरी की, खोटी याची तपासणी करणारी कोणतीच सक्षम यंत्रणा प्रक्रियेमध्ये नव्हती. याचा फायदा घेऊन अनेक शिक्षकांनी खोटी प्रमाणपत्रे किंवा नोकरीचे वर्ष, तसेच किलोमीटर अट याबाबत चुकीची माहिती देऊन राहत्या ठिकाणाहून जवळच्या गावी बदली करून घेण्याचे प्रयत्न केल्याचे दिसून आले. काही शिक्षकांनीच याबाबत आक्षेप नोंदविले होते. त्यानंतर शासनाने चौकशी करण्याचे आदेश देऊन अहवाल सादर करण्याचे आदेशित केले. त्यानुसार शिक्षण विभागाने एका समितीच्या नियंत्रणाखाली ही पडताळणी केली होती.

९ ते ११ जुलै या कालावधीत समितीने पडताळणी केली. त्यानंतर नेमके कुणावर कारवाई होणार, याकडे शिक्षकांचे लक्ष लागले आहे. चुकीची माहिती देणाऱ्यांमुळे प्रामाणिकपणे अर्ज सादर केलेल्या शिक्षकांना फटका बसल्याचे चित्र आहे. त्यामुळे चुकीची माहिती देणाऱ्या शिक्षकांची यादी कधी जाहीर होणार याची प्रतीक्षा या शिक्षकांना आहे.

काही दिवसांपूर्वी हा अहवाल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला होता; मात्र त्यामध्ये काही किरकोळ त्रुटी निघाल्याने ही यादी जाहीर होण्यास विलंब होत आहे. संवर्ग एकच्या शिक्षकांच्या ओळखीचे प्रमाणपत्र मागविण्यात आले आहेत. ते आल्यानंतरच ही संपूर्ण यादी जाही होणार असल्याचे संकेत शिक्षण विभागाने दिले आहेत.

Web Title: Teacher Transfer Process Cheaking Report