अनुदानासाठी शिक्षकांची 'काळी दिवाळी'

अनुदानासाठी शिक्षकांची 'काळी दिवाळी'

बीड : शासनाने सप्टेंबर 2016 पासून शाळांना 20 टक्के अनुदान जाहीर केले. आता सर्व शाळा 100 टक्के अनुदानाच्या टप्प्यावर आलेल्या असतानाही अनुदान दिले जात नसल्याचा आरोप करत मंगळवारी (ता. 6) शिक्षकांनी बीडमध्ये 'काळी दिवाळी' आंदोलन केले.

दिपावलीच्या नरकचतुर्थीचा सण असतानाही शिक्षकांनी काळ्या फिती लाऊन जिल्हा परिषदेसमोर धरणे धरत शासना विरोधात घोषणा दिल्या. शासनाने 2016 मध्ये शाळांना 20 टक्के अनुदान घोषित केले. त्यावेळी प्रत्यक्षात 60 टक्के अनुदानावर असलेल्या शाळांनीही 20 टक्के अनुदान स्विकारले. आता सर्व शाळा नियमाप्रमाणे 100 टक्के अनुदानाच्या टप्प्यावर आलेल्या आहेत. याबाबत अनेक वेळा मागणी आणि आंदोलने करुनही शासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप जिल्हा परिषदेमार्फत मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आला.

येत्या अधिवेशनात प्रचलित नियमानुसार अनुदानाचा निर्णय जाहीर करुन निधी द्यावा, अघोषित सर्व शाळांना अनुदान आणि निधी द्यावा अशी मागणी करत घोषणा देण्यात आल्या. कायम विना अनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने झालेल्या आंदोलनात शिक्षण संस्थाचालक मंडळाचे दिपक घुमरे, वैजनाथ चाटे, जितेंद्र डोंगरे, लक्ष्मण जगताप, मुक्ता मोटे, तुकाराम शिंदे, प्रताप पवार, गवळी, रविंद्र बुकान, भागवत यादव, रेड्डी, गरुड, वैजिनाथ शिंदे, ज्ञानेश्वर मुंडे, आत्माराम वाव्हळ आदींनी आंदोलनात सहभाग घेतला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com