Latur News : लातूरला रंगणार शिक्षक साहित्य संमेलन; मंगळवारपासून तीन दिवस उपक्रम, संविधानावरही मंथन

महाराष्ट्र प्रदेश शिक्षक प्रतिनिधी सभेच्या वतीने येथे ३० जानेवारी ते एक फेब्रुवारीदरम्यान नववे राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलन होणार आहे.
teachers sahitya sammelan at latur three day program 30th january 2024
teachers sahitya sammelan at latur three day program 30th january 2024esakal

Latur News : महाराष्ट्र प्रदेश शिक्षक प्रतिनिधी सभेच्या वतीने येथे ३० जानेवारी ते एक फेब्रुवारीदरम्यान नववे राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलन होणार आहे. शिक्षकांच्या साहित्यासोबतच संविधानावर विचारमंथन होणार असल्याची माहिती शिक्षक प्रतिनिधी सभेचे प्रदेशाध्यक्ष तथा संयोजक कालिदास माने यांनी रविवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.

येथील दयानंद सभागृहात अॅड. मनोहरराव गोमारे साहित्य नगरीत हे संमेलन होणार आहे. क्रीडामंत्री संजय बनसोडे हे संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत. ज्येष्ठ साहित्यिक ऋषिकेश कांबळे संमेलनाध्यक्ष आहेत. ज्येष्ठ साहित्यिक, लेखक, वक्ते आणि कवी यांचे विचार ऐकण्याची संधी मिळणार आहे.

संमेलनाच्या अनुषंगाने मंगळवारी (ता. ३०) सकाळी साडेआठला ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे. यावेळी महाराष्ट्र - गोवा बार कौन्सिलचे सदस्य अॅड. अण्णाराव पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख अॅड. बळवंतराव जाधव, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पंडित धुमाळ, अॅड. उदय गवारे,

प्राथमिक शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे, महाराष्ट्र विकास आघाडीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बसवंत उबाळे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी संजय मस्के, संस्थाचालक संघटनेचे विभागीय अध्यक्ष रामदास पवार आदी उपस्थितीत राहणार आहेत. सकाळी दहाला माजी आमदार दिनकर माने यांच्या हस्ते ग्रंथ प्रदर्शनाचे उद्‍घाटन होईल.

अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार प्रा. बी.व्ही. मोतीपवळे असतील. सकाळी अकराला पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते संमेलनाचे उद्‍घाटन होईल. संमेलनाध्यक्ष ऋषिकेश कांबळे, स्वागताध्यक्ष संजय बनसोडे, खासदार सुधाकर शृंगारे , आमदार अमित देशमुख, अभिमन्यू पवार, संभाजी पाटील निलंगेकर, रमेश कराड, धीरज देशमुख आदी उपस्थित राहातील.

विविध परिसंवाद, कविसंमेलन

संमेलनात ‘शिक्षण काल, आज आणि उद्या’ या विषयावर परिसंवाद होईल. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक फ. म. शहाजिंदे असतील. माजी प्राचार्य डॉ. कुसुम मोरे, डॉ. जयद्रथ जाधव, डॉ. ज्ञानदेव राऊत परिसंवादात सहभागी होतील.

३१ जानेवारीला सकाळी कविसंमेलन, दुपारच्या सत्रात ‘भारतीय संविधान व आजचे वर्तमान’ या विषयावर परिसंवाद होईल. दुपारी चारला ‘भारतीय संविधान आणि आपली जबाबदारी’ या विषयावर प्रा. विठ्ठल कांगणे यांचे व्याख्यान होणार आहे.

एक फेब्रुवारीला सकाळी ‘महिला सबलीकरण व शिक्षण’ या विषयावरील परिसंवाद होणार आहे. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर - घुगे असतील.

पुरस्कार वितरण, ग्रंथ प्रकाशन

संमेलनाच्या समारोप सत्रात लोकनेते विलासराव देशमुख ज्ञानरत्न पुरस्कार, जीवनगौरव पुरस्कार वितरण, कालिदासराव माने गौरव ग्रंथाचे प्रकाशन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते होईल. अध्यक्षस्थानी माजीमंत्री दिलीपराव देशमुख असतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com