पंचवार्षीक आराखड्यांना तांत्रीक आडगळ

file photo
file photo
Updated on

नांदेड: शासनाच्या ग्रामविकास विभागांतर्गत ‘आमचा गाव आमचा विकास’ अंतर्गत ग्रामीण विकासाचे धोरण राबविण्यात येत आहे. पाच वर्षांच्या संभाव्य कालावधीत गाव-खेड्यांचा विकास साधण्यासाठी जिल्ह्यातील १३०९ ग्रामपंचायतींडून पंचवार्षिक आराखडे तयार करून मंगळवार (ता. ३१) पर्यंत शासनाच्या संकेतस्थळावर अपलोडसाठी मुदत होती. मात्र, ग्रामसभेच्या मान्यतेने पंचायत समितीस्तरावर ऑफलाइन पंचवार्षिक आराखडे सादर करण्यात आले. पण तांत्रिक अडचणीअभावी जिल्ह्यातील एकी पंचवार्षिक आराखडा शासनाच्या संकेतस्थळावर अपलोड झाला नाही.

ग्रामविकासाच्या विविध योजनांच्या माध्यमातून ग्रामीण नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी केंद्र शासनाच्या ‘आमचा गाव आमचा विकास’ उपक्रमाच्या धोरणानुसार ग्रामपंचायतींना २०२०-२५ या कालवधीचे पंचवार्षिक आराखडे तयार करण्याचे आदेश जारी करण्यात आले होते. लोकसंख्येच्या निकषांनुसार यंदाचा २०२०-२१ चा वार्षिक कृती आराखडा जिल्हा परिषद प्रशासनाने पंचायत समितीमार्फत ग्रामपंचायतींकडून मागविण्यात आले होते. दरम्यान, संभाव्य काळात विकासाच्या संकल्पक धोरणांनुसार ग्रामसभेच्या मान्यतेने पंचायत समितीच्या मंजुरीने जिल्हाप्रशासनाकडे वर्ग करण्याच्या प्रक्रियेत शासन स्तरावरून ऑनलाइनचे निकष जारी करण्यात आले आहेत. जिल्हा परिषदेच्या विशेष सर्वसाधारण सभेत पंचवार्षिक कृती आराखडे तयार करण्यासाठी (ता. दहा) ची मुदत देण्यात आली होती. 

आराखड्यानुसार मिळतो विकास निधी 
ग्रामसभेच्या मान्यतेने पंचायत समिती स्तरावर गटविकास अधिकाऱ्यांना (ता. ३१) पर्यंत आराखड्यातील तांत्रिक बाबी तपासून शासनाच्या संकेतस्थळावर पंचवार्षिक आराखडे अपलोड करण्याची मुदत जिल्हा प्रशासनाने दिली. ग्रामपंचायतींना थेट केंद्र शासनाकडून मिळणारा चौदावा वित्त आयोगाचा निधी पंचवार्षिक, वार्षिक कृती आराखड्यावर अवलंबून असल्याने ग्रामपंचात स्तरावर आराखडे तयार करण्याची लगबग असते.
 
पहिल्यांदाच ऑनलाईनचे निकष 
शासनाने पहिल्यांदाच पंचवार्षिक आराखडे ऑनलाइन अपलोडचे निकष जारी केल्यामुळे ग्रामसभेच्या मान्यतेने पंचायत समिती स्तरावर ऑफलाइन आराखडे मुदतीत प्राप्त झाल्याचे सांगण्यात येत आहे. प्रत्यक्षात गावपातळीवर पंचवार्षिक आराखडे तयार करण्यापासून ग्रामसभेसमोर मांडण्यापर्यंत आनेक आडगळी आहेत. ग्रामपंचायतींच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांचे रुसवे- फुगवे पार करत ग्रामसभेत पोचलेल्या कृती आराखड्यांच्या पंचायत समितीपर्यंत दुरुस्त्या केल्या जातात. त्यामुळे कृती आराखड्यांना मुदत केवळ सोपस्कार ठरते. पंचायत समिती स्तरावर पंचवार्षिक व वार्षिक कृती आरखडे ऑफलाइन प्राप्त झाले असून ऑनालाइनसाठी तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे.

 

शासन स्तरावरून मुदतवाढ                                                                        ग्रामपंचायतीचे पंचवार्षिक व वार्षिक आराखडे पंचायत समितीच्या मंजुरीने शासनाच्या संकेतस्थळावर अपलोडसाठी रविवार (ता. पाच) पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

शासन निर्णयानुसार ग्रामपंचायतींकडून पंचायत समितीस्तरावर ऑफलाइन पंचवार्षिक आराखडे प्राप्त झाले आहेत. तांत्रिक अडचणींअभावी ऑनलाइन होऊ शकले नाही. रविवार (ता. पाच) पर्यंत ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तालुका स्तरावर कॅम्प लावण्यात आले आहेत. मुदतीत सर्व आराखडे ऑनलाइन होतील.
व्ही. आर. कोंडेकर (उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Deputy Collector Eknath Bangale inspected seized illegal sand stock and reviewed security, distribution, and e-auction plans in Gangapur taluka
The Education Department appointed two teachers at Sayyadpur ZP School after villagers protested against the shortage of teaching staff.
Progressive farmer Govardhan Ugle received the Maharashtra Krushibhushan Award for outstanding achievements in organic farming.
Food Safety Department inspection alerts triggered shop closures amid concerns over gutkha sales and loose edible oil distribution.
Marathi News Esakal
www.esakal.com