छेडछाडीला कंटाळून नववीत शिकणाऱ्या मुलीची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 जानेवारी 2019

छेडछाडीचा आरोप असलेले अमर तिडके आणि हनुमंत सावंत या दोघां विरोधात वडवणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीच्या आत्महत्येनंतर आरोपी फरार झाले असून, पोलिस शोध घेत आहेत.

बीड : छेडछाडीला कंटाळून नववीत शिकणाऱ्या मुलीने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना आज (गुरुवार) सकाळी उघडकीस आली.

मिळालेल्या माहितीनुसार, बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील ब्रह्मनाथ तांडा येथील हा प्रकार आहे. विष पिऊन तिने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. 

छेडछाडीचा आरोप असलेले अमर तिडके आणि हनुमंत सावंत या दोघां विरोधात वडवणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीच्या आत्महत्येनंतर आरोपी फरार झाले असून, पोलिस शोध घेत आहेत.

Web Title: teenage girl who is struggling with tiredness commits suicide