esakal | टोकाई देवीचे मंदिर बंद असल्याने भाविक घेताहेत पायरीचे दर्शन
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

नवरात्रोत्सवात टोकाई मातेच्या दर्शनासाठी भाविक रात्री तिन वाजल्या पासुन दर्शनासाठी येतात परंतु या वर्षी  कोरोना रोगाच्या परिनाम टोकाई गडावरील नवरात्रोत्सवार होत आहे.

टोकाई देवीचे मंदिर बंद असल्याने भाविक घेताहेत पायरीचे दर्शन

sakal_logo
By
मारोती काळे

कुरुंदा (जिल्हा हिंगोली) : वसमत तालुक्यातील कुरुंदा येथिल टोकाई गडावर विविध धार्मीक कार्यक्रम दरवर्षी उत्साहात साजरे होत आसतात यावर्षी मात्र कोरोना संकटामुळे यावर्षी मंदिर बंद असल्याने भाविक पायरीचे दर्शन घेऊन समाधान मानत आहेत.

नवरात्रोत्सवात टोकाई मातेच्या दर्शनासाठी भाविक रात्री तिन वाजल्या पासुन दर्शनासाठी येतात परंतु या वर्षी  कोरोना रोगाच्या परिनाम टोकाई गडावरील नवरात्रोत्सवार होत आहे.   टोकाई गडावरील टोकाई मातेचे मंदीर सध्या भाविकांसाठी बंद आसल्याने दर्शनासाठी येणार्या भाविकांची गर्दी ओसरल्याचे पहावयास मिळत आहे.

हेही वाचा - जगातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण असलेल्या द्रास येथे पूर्णेचा जवान आॅनलाईन परिक्षा देत आहे

यावर्षी टोकाई गड हा हिरवळीने नटला

गडावरील टोकाई मातेचे मंदीर सर्वदुर परिचीत आहे नवरात्रोत्सवात टोकाई मातेच्या दर्शनासाठी येणार्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात पहावयास मिळते हिंगोली,परभणी,नांदेड आदी जिल्ह्यातुन मोठ्या संखेंने भाविक टोकाई मातेच्या दर्शनासाठी गर्दी करत आसतात परंतु जागतीक कोरोना महामारीमुळे दर्शनासाठी येणार्या भावीकांची संख्या तुरळक असल्याचे चित्र आहे. टोकाई गडावर गत वर्षापासुन सिनेआभीनेते सयाजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सह्याद्री देवराई वृक्षप्रेमी मित्र मंडळाकडुन या गडावर वृक्षारोपण लागवड तसेच त्याचे संगोपनाचे काम मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात आले त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी टोकाई गड हा हिरवळीने नटला आहे  वृक्षप्रेमिकडुन हा परीसर निसर्गरम्य करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्या मुळेे या परीसरातील निसर्गरम्य पर्यटनस्थळ म्हणुन टोकाई गड  प्रकाश झोतात येत आहे या गडावर वर्षातील बाराही महीने भाविकांची गर्दी पहावयास मिळते.

येथे क्लिक करा नांदेड : मराठा आरक्षण स्थगिती विरोधात रस्ता रोको- लोकप्रतिनिधींचा निषेध, गाढवांना निवेदन -

पिढ्यान पिढ्या चालत आसलेली परंपरा या वर्षी कोरोनामुळे  खंडीत

यावर्षी  टोकाई गडावरील टकाई मातेचे मंदीर भाविकांसाठी दर्शनासाठी बंद असल्याने दर्शनासाठी आलेल्या भावीकांना मंदीराच्या पायरीचे दर्शन घेऊन समाधान मानावे लागत आहे नवरात्र उत्सवात टोकाई गडावर  विविध धार्मीक कार्यक्रमाची रेलचेल असते विजया दशमीनिमित्ताने गाडावर मोठी यात्रा भरते परंतु कोरोना रोगाच्या महामारी मुळे येथिल सर्व धार्मीक कार्यक्रम यात्रा रद्द करण्यात आली आहे त्या मुळे पिढ्यान पिढ्या चालत आसलेली परंपरा या वर्षी कोरोनामुळे  खंडीत झाली आहे. यामुळे यावर्षी  टोकाई गडावर फुलवाले मिठाईवाले नारळ विक्री करनारे विविध धार्मिक साहित्याची विक्री ची दुकाने बंद आहेत.

संपादन - प्रल्हाद कांबळे

loading image