esakal | नांदेड : मराठा आरक्षण स्थगिती विरोधात रस्ता रोको- लोकप्रतिनिधींचा निषेध, गाढवांना निवेदन
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

मुदखेड तालुक्यातील मराठा समाजातील युवकांनी न्यायालयीन आरक्षण लढ्यासाठी संघटित होऊन अहिंसेच्या मार्गाने गांधीगिरी पद्धतीने सामूहिक लढा उभारण्याचा निर्धार केला होता. देशात कोरोना महामारी च्या संकटामुळे भयानक परिस्थिती निर्माण झाली असल्याने रस्ता रोको तोडफोड चक्काजाम धरणे घेराव

नांदेड : मराठा आरक्षण स्थगिती विरोधात रस्ता रोको- लोकप्रतिनिधींचा निषेध, गाढवांना निवेदन

sakal_logo
By
प्रताप देशमुख

बारड (जिल्हा नांदेड) - सकल मराठा आरक्षण युवक समितीने जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना आरक्षण विषयक सरकारची भूमिका मांडण्यासाठी पाठविलेले खुल्या चर्चेचे निमंत्रण धुडकावल्याने खासदार-आमदार यांचा निषेध व्यक्त करुन दोन गाढवांच्या गळ्यात निवेदनाच्या प्रतीचा फलक लटकून सुप्रीम कोर्टाच्या स्थगिती निर्णया विरोधात रास्ता रोको करण्यात आला असून आंदोलन तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.

मुदखेड तालुक्यातील मराठा समाजातील युवकांनी न्यायालयीन आरक्षण लढ्यासाठी संघटित होऊन अहिंसेच्या मार्गाने गांधीगिरी पद्धतीने सामूहिक लढा उभारण्याचा निर्धार केला होता. देशात कोरोना महामारी च्या संकटामुळे भयानक परिस्थिती निर्माण झाली असल्याने रस्ता रोको तोडफोड चक्काजाम धरणे घेराव यांना बगल देऊन न्यायप्रविष्ट लढ्यात लोकप्रतिनिधींची नेमकी भूमिका काय याचा शोध घेण्यासाठी युवकांनी एकजुटीची मोट बांधली होती.राज्यातील मराठा युवकांनी आरक्षण मिळालेच पाहिजे या मागणीसाठी दिलेले बलिदान व्यर्थ जाणार नाही यासाठी संघटित लढा देण्याचा निर्धार युवकांनी केला होता.

हेही वाचा भाजपकडून घोषणा : एकनाथ खडसेंचा राजीनामा, मात्र देवेंद्र फडणवीस म्हणतात मला माहिती नाही

खासदार आमदार यांनी वेळकाढू धोरणाचा अवलंब करत निमंत्रण धुडकावल्याने

सध्या बहुचर्चित असलेले मराठा आरक्षण न्यायप्रविष्ट असल्याने अंतिम निकालापूर्वी स्थगिती निर्णयावर केंद्र सरकार राज्य सरकारकडे तर राज्य सरकार केंद्र सरकारकडे बोट दाखवत मराठा समाजाला वेटिंग वर ठेवण्याचा प्रयत्न सुरू असल्याने यामध्ये नेमका थोडा कोणाचा चिकित्सा करण्यासाठी युवकांनी वज्रमूठ बांधून खासदार प्रताप पाटील चिखलीकर आमदार अशोक चव्हाण यांना सरकारची भूमिका मांडण्यासाठी खुल्या चर्चेचे निमंत्रण पाठविले होते. परंतु खासदार आमदार यांनी वेळकाढू धोरणाचा अवलंब करत निमंत्रण धुडकावल्याने मराठा समाजातील युवकांनी आक्रमक भूमिका घेतली असून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

नांदेड- भोकर मुख्य राष्ट्रीय महामार्गावर बारड तालुका मुदखेड येथील मुख्य चौकात रस्ता रोको

मराठा आरक्षणाबाबत सुरु सुप्रीम कोर्टाने दिलेल्या स्थगिती विरोधात मराठा सकल आरक्षण तालुका योग समितीच्या वतीने ता. २१(बुधवार) नांदेड भोकर मुख्य राष्ट्रीय महामार्गावर बारड तालुका मुदखेड येथील मुख्य चौकात रस्ता रोको करण्यात आला आहे.पोलीस प्रशासनात वीस मिनिटांचा वेळ दिला होता मराठा आरक्षण समितीचे प्रमुख विजय देशमुख बारडकर ,माधव पावडे ,शरद कवळे ,सूर्यभान पाटील डोंगरगावकर यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको करत मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे, मराठा आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे घोषणांनी सर्वांचे लक्ष वेधले होते.खासदार प्रताप पाटील चिखलीकर तसेच आमदार अशोक चव्हाण यांनी खुल्या चर्चेचे निमंत्रण धुडकावल्याने निषेध नोंदवून दोन गाढवांच्या गळ्यात निवेदनाची प्रत अडकवून संताप व्यक्त केला.मराठा आरक्षण योग समितीने जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना मतदार संघात फिरकू देणार नाही तसेच वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून हातात काठ्या घेऊन जेलमध्ये जाऊ असा गर्दीत तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

येथे क्लिक करा - आंध्र, तेलगंणात शंभर विशेष रेल्वे तर मराठवाड्यात केवळ तीन -

यापुढे निवडणुकीसाठी मते मागण्यासाठी आल्यास लोकप्रतिनिधींना सडेतोड उत्तर देण्यासाठी हातात दगड घेऊ

मराठा सकल युवक आरक्षण समितीने लोकप्रतिनिधींच्या विरोधातील भूमिका स्पष्ट केली. यापुढे निवडणुकीसाठी मते मागण्यासाठी आल्यास लोकप्रतिनिधींना सडेतोड उत्तर देण्यासाठी हातात दगड घेऊ, असा दम यावेळी कार्यकर्त्यांनी दिला आहे. भाजप विधानसभा अध्यक्ष निलेश देशमुख बारडकर यांनी मराठा आरक्षण विषयक मत मांडले. काँग्रेस जिल्हा सल्लागार उत्तमराव लोमटे यांनी आरक्षणाविषयी आपले मत व्यक्त केले. यावेळी पोलीस सहायक निरीक्षक नितीन खंडागळे यांनी मराठा आरक्षण समितीचे लेखी निवेदन स्वीकारून शासनाला त्वरित पाठवण्याचे आश्वासन दिले. यावेळी विजय देशमुख, माधव पावडे, शरद कवळे ,दीपक पाटील, सूर्यभान पाटील ,सतीश व्यवहारे , कृष्णा देशमुख, निळकंठ देशमुख ,बाळासाहेब गव्हाणे ,गजानन मुसळे ,माधव पवार ,आशिष देशमुख, वीरेंद्र देशमुख ,अमोल लोमटे, दीपक लोमटे ,कपिल पवार, वैभव कवळे, सचिन बने ,नितीन भोसले यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

संपादन - प्रल्हाद कांबळे