भीषण अपघातात टेंपोचालक ठार

File photo
File photo

उमरगा (जि.उस्मानाबाद) ः राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात टेंपोचालकाचा मृत्यू झाला; तर अन्य एक गंभीर जखमी झाला. ही घटना रविवारी (ता. 18) रात्री साडेअकराच्या सुमारास शहराजवळील भाग्यरथी ढाब्याजवळ घडली.

राष्ट्रीय महामार्गावरील भाग्यरथी ढाब्याजवळ सोलापूरहून तुरोरीच्या दिशेने निघालेल्या आयशर टेंपोला (एमएच 13, सीयू-8497) अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात टेंपोचालक चरण महादेव देवकते (वय 33, रा. बाणेगाव, ता. उत्तर सोलापूर) हे गंभीर जखमी झाले. उपचारासाठी घेऊन जाताना त्यांचा वाटेतच मृत्यू झाला. तर, बाजूला बसलेले ज्ञानेश्वर महासिद्ध चाफाकरंडे (वय 36, रा. बाणेगाव) हे गंभीर जखमी झाले.

त्यांना उपचारासाठी सोलापूरला हलविण्यात आले आहे. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान, अपघातस्थळी टेंपोच होता. त्यामुळे टेंपोने थांबलेल्या वाहनास धडक दिली की, अज्ञात वाहनाने टेंपोला धडक दिली याबाबत पोलिस तपास करीत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com