तुर्काबादला किराणा दुकान फोडून 10 हजारांची चोरी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 नोव्हेंबर 2018

तुर्काबाद खराडी (ता.गंगापुर, जि. औरंगाबाद ) येथे चोरट्यांनी किराणा दुकान फोडुन साहित्यासह 10 हजार रुपये चोल्याची घटना शनिवारी (ता.17) पहाटे साडेतीनच्या सुमारास उघडकीस आली.
 

लिंबेजलगाव : तुर्काबाद खराडी (ता.गंगापुर, जि. औरंगाबाद ) येथे चोरट्यांनी किराणा दुकान फोडुन साहित्यासह 10 हजार रुपये चोल्याची घटना शनिवारी (ता.17) पहाटे साडेतीनच्या सुमारास उघडकीस आली.

येथील लिंबेजळगाव-तुर्काबाद खराडी रस्त्यावर असलेल्या कारवाडी येथे मोहन सोनवणे यांचे सावता किराणा दुकान आहे. शुक्रवारी नेहमीप्रमाणे रात्री दहाच्या सुमारास ते दुकान बंद करून दुकानाशेजारीच असलेल्या घरात झोपले असता मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी त्याच्या व शेजारील सर्व घराच्या कड्या लावत दुकानांत प्रवेश केला व दुकांनातील किराणा साहित्यासह 10 हजार रुपये चोरले.

सावता सोनवणे हे कंपनीत जाण्यासाठी पहाटे उठले असता बाहेरून त्यांच्या कड्या लावल्या असल्याचे लक्षात आले. आरडाओरड केली असता आपल्या दुकानात चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी वाळूंज पोलिसांना घटनेची माहीती दिली असता पोलिस घटनास्थळी दाखल झाले व चोरट्यांचा माग ग्रामस्थांच्या मदतीने घेतला. मात्र चोरटे पसार झाले होते. अज्ञात चोरट्याविरुद्ध वाळूंज पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Web Title: Ten thousand rupees stolen by a grocery shop in Turkunabad