नाफेड'च्या नोंदणी केंद्रास मुदतवाढ 

संग्रहित छायाचित्र.
संग्रहित छायाचित्र.

जालना -  नाफेडच्या उडीद, मूग, सोयाबीन पिकांच्या ऑनलाइन नोंदणीची नोफडने मुदतीस तोंडी वाढ दिली आहे. दरम्यान, "सकाळ'ने यासंदर्भात बातमी प्रकाशित केल्यानंतर मुदतवाढीचे तोंडी आदेश प्राप्त झाले आहेत. यासंदर्भातील लेखी आदेश बुधवारी (ता.16) प्राप्त होण्याची शक्‍यता आहे. 

जिल्ह्यात जालना, भोकरदन, मंठा, अंबड व तीर्थपुरी येथे नाफेडचे ऑनलाइन नोंदणी केंद्र सुरू करण्यात आले आहे; परंतु उडीद, मूग पिकांची ऑनलाइन नोंदणीसाठी ता. 15 ऑक्‍टोबरपर्यंत मुदत होती. मात्र, नाफेडने ऑनलाइन नोंदणी केंद्र सुरू करण्यास विलंब केल्याने शेतकऱ्यांना ऑनलाइन नोंदणीसाठी केवळ नऊ ते दहा दिवस मिळाले होते. यासंदर्भात "सकाळ'ने वृत्त प्रकाशित केले होते. याची दखल घेत नाफेडच्या उडीद, मूग, सोयाबीन पिकांच्या ऑनलाइन नोंदणीच्या मुदतवाढीचे मंगळवारी (ता.15) तोंडी आदेश प्राप्त झाले आहेत. 
नवीन आदेशानुसार मुगाची ऑनलाइन नोंदणीसाठी ता. 30 ऑक्‍टोबरपर्यंत तर उडीद, सोयाबीन ऑनलाइन नोंदणीसाठी ता. 15 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना नाफेडकडे मूग, उडीद, सोयाबीन नोंदणीसाठी मुबलक कालावधी मिळणार आहे. 

मूग, उडीद, सोयाबीन या पिकांच्या नाफेडच्या ऑनलाइन नोंदणी केंद्राच्या मुदतवाढीचे मंगळवारी (ता.15) तोंडी आदेश प्राप्त झाले आहेत. यासंदर्भातील लेखी आदेश बुधवारी किंवा गुरुवारी प्राप्त होतील. जिल्ह्यातील पाचही नोंदणी केंद्रांवर या तीनही पिकांची नोंदणी सुरू राहणार आहे. 
- गजानन मगरे, जिल्हा मार्केटिंग अधिकारी, जालना. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com