सावधान...नांदेड शहरात ‘या’ टोळीची वाढतेय दहशत

File photo
File photo
Updated on

नांदेड : मोकाट कुत्र्यांची वाढती संख्या नांदेडकरांसाठी घातक ठरत आहे. या साऱ्या कुत्र्यांना दररोज खाणे-पिणे मिळणे कठीण झाल्याने ते अजूनच आक्रमक होताना दिसत आहे. अनेक कुत्र्यांना खायला मिळत नसल्याने ते मरत असताना याकडे स्थानिक प्रशासनाने तर सोडाच प्राणी मित्रांचेही लक्ष नाही. दिवसेंदिवस मोकाट कुत्र्यांचा प्रश्न हा गंभीर विषय बनत चालला आहे.याकडे दुर्लक्ष झाल्यास अनेकांना या कुत्र्यांनी चावा घेतल्यामुळे घातक आजारांना सामोरे जावू लागू शकते.

नागरिकांचा जीव धोक्यात
वाढत्या मोकाट कुत्र्यांमुळे नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. त्यातच खायला मिळणे कठीण झाल्याने कुत्र्यांनाही आपला जीव गमवावा लागत आहे. अशावेळी प्रामीमात्रांवर दया करा, मोकाट कुत्र्यांना मारू नका, मग या मोकाट कुत्र्यांपासून एखाद्या चिमुकल्याचा किंवा व्यक्तीचा जीव गेला तरी चालेल, मात्र कुत्र्यांना मारु नका, मारणाऱ्यांवर कार्यवाही केल्या जाईल, अशा मानसिकतेत असलेले प्राणीप्रेमी मात्र कुठेच आढळत नाही. या अदृश्य प्राणीप्रेमींच्या मागे कायदा मात्र प्रामाणिकपणे आपली भूमिका बजावतो आहे. मोकाट कुत्र्यांवर त्वरित आळा बसविण्यासाठी उपाययोजना केल्या गेल्या नाहीत तर याचे गंभीर परिणाम भविष्यात नागरिकांना भोगावे लागतील.

चिमुकले ठरताहेत ‘टार्गेट’
कुत्र्यांचे वाढते प्रमाण व त्यांना खायला मिळत नसल्याने उपासमारीने होत असलेले कुत्र्यांचे मृत्यू व वाढते आजारही कुत्र्यांसोबत मनुष्यासाठीही धोक्याची घंटा आहे. महापालिका प्रशासनाने यावर गांभीर्याने विचार करून कुत्र्यांच्या वाढत्या संख्येवर आळा घालण्याची मागणी नागरिकांतून जोर धरू लागली आहे. सकाळी शिकवणी क्लासला जाणे, रात्रीचा शेवटचा चित्रपट पाहून घरी जाणे, उशीरा रात्री बाहेर गावावरून येणारे व रस्त्याने एकटे दिसणारे चिमुकले या मोकाट कुत्र्यांचे टार्गेट ठरत आहेत. अशांवर यांचा हल्ला होतो. या हल्ल्यातून आपला बचाव करणारे अनेकवेळा तोल जाऊन पडल्याने गंभीर जखमी झालेले आहेत. होताहेत.

गांभिर्याने विचार करण्याची गरज
मुख्य रस्त्यांसह गल्ली-बोळांतील रस्त्यांवर मोकाट कुत्र्यांची दहशत ही नित्याचीच झाली आहे. कोणी ना कोणी केवळ या कुत्र्यांमुळे जखमी झाल्याचे सांगताहेत. मात्र, हा गंभीर अपघात नोंदवायला कोणाकडे व या प्रकारावर कोणी व कसा वचक बसवायचा, या सर्व प्रश्नांनी लोक वैतागून गेले आहेत. कुत्र्यांचे होत असलेले हल्ले व कुत्र्यांमुळे होत असलेले अपघात विनाकारण निमुटपणे सहन करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. त्यामुळे प्राणीमित्रांसह महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी ही बाब गांभीर्याने घेणे अत्यंत गरजेचे झाले आहे.

हे देखील वाचा - ‘कोरोना’चा कशावर झाला परिणाम, ते वाचाच ​

मोकाट कुत्र्यांना आवरायचे कुणी
शहरातील प्रत्येक चौकात व गल्ली-बोळीत मोकाट कुत्र्यांचा धुमाकुळ व तितकीच ये-जा करणाऱ्या लोकांवर आक्रमकता वाढल्याने आता या मोकाट कुत्र्यांना आवरायचे कुणी, असा प्रश्न व भीती शहरात पसरली आहे. एक दोन नव्हे तर चक्क दहा-पंधरा कुत्र्यांचा झुंड एकाचवेळी एखाद्याच्या अंगावर धाव घेत असेल तर अशा व्यक्तीची त्यावेळी काय अवस्था होत असेल, याचा साधा विचारही केला तरी भीती वाटते. रात्री उशीरा रस्त्याने ये-जा करणे कठीण करणाऱ्या मोकाट कुत्र्यांवर आवर घालणे गरजेचे झाले आहे. मात्र यासाठी नेमकी तक्रार द्यावी कुणाजवळ, हा प्रश्न आहे.  इतक्या साऱ्या कुत्र्यांना डांबून ठेवायला तितकी जागा मनपाजवळ नसल्याने मोकाट कुत्र्यांमुळे जीवघेणे संकट ओढवीले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Political Drama in Kej
Officials from the Food and Drug Administration conducting a raid on Bapu Maharaj's ashram in Mungsapur.
MLA Vilas Bhumare demand financial aid
Deglur Land Controversy: Inquiry Ordered Into Alleged Irregular Plot Distribution
Marathi News Esakal
www.esakal.com