थायलंडच्या पर्यटकांनी पोलिसांना हातच जोडले

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 डिसेंबर 2018

औरंगाबाद : जपानी पर्यटकांना शनिवारी (ता. एक) पाऊण तास रस्त्यात थांबविलेल्या पोलिसांनी रविवारी (ता. दोन) रात्री मुंबईहून आलेल्या थायी पर्यटकांना वेठीस धरले. घाबरलेल्या थायी पर्यटकांनी पोलिसांना अक्षरश: हात जोडले. आम्हाला त्रास देऊ नका, अशी विनवणी केल्यानंतर पोलिसांनी चालकाचा परवाना जप्त करून वाहन सोडले. 

केंद्र व राज्य शासनाचे पर्यटनाला चालना देण्याचे धोरण आहे; मात्र या धोरणालाच हारताळ फासण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे. तत्कालीन पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी पर्यटकांच्या वाहनांना शहरात प्रवेशबंदी केली होती; मात्र त्यांनी पर्यटकांच्या वाहनांना त्यातून सूट दिली होती. केवळ ट्रॅव्हल्स कंपनीच्याच वाहनांना शहरात बंदी केली होती. अमितेशकुमार यांचा ट्रॅव्हल्सबंदीचा नियम दोन वर्षांनंतरही कायम आहे. विशेष म्हणजे आता पोलिस टुरिस्ट वाहनांनाही ट्रॅव्हल्स कंपनीच्या वाहनाप्रमाणे वागणूक देत आहेत. शनिवारी (ता. एक) वाहतूक पोलिसांनी अमरप्रीत सिग्नलवर जपानी पर्यटकांची बस तब्बल 45 मिनिटे अडवून धरली होती. या पाठोपाठ पोलिसांनी थायी पर्यटकांनाही अशीच वागणूक दिली. 

चालकाचा परवाना जप्त 
पोलिसांनी रविवारी (ता. 2) रात्री आठ वाजेच्या सुमारास सेव्हनहिल्स परिसरात थायलंडच्या पंधरा ते वीस पर्यटकांचा ग्रुप घेऊन आलेल्या बसला अडवून धरले. पोलिसांच्या वागणुकीने थायी पर्यटक हतबल झाले. घाबरलेल्या थायी पर्यटकांनी खाली उतरून पोलिसांना हात जोडले. त्यानंतर पोलिसाने वाहनचालकाचा परवाना जप्त करून बस सोडल्याची माहिती सूत्रांनी दिली. हा थायी ग्रुप शहरातील एका पंचतारांकित हॉटेलात मुक्कामी थांबलेला होता. 

Web Title: Thailand tourist requesting aurangabad police