Dharashiv News : अंतिम निकाल आमच्याच बाजूने ; धाराशिव जिल्ह्यात शिवसेना 'शिंदे' आणि ‘ठाकरे’ दोन्ही गटांचे आमदार ठाम

शिंदे, ठाकरे गटाच्या आमदारांचे दावे-प्रतिदावे
dharashiv
dharashivsajak

धाराशिव : शिवसेनेच्या फुटीनंतर आमदारांच्या पात्र-अपात्रतेबाबत बुधवारी (ता. ९) निकाल लागणार आहे. धाराशिव जिल्ह्यात शिवसेना शिंदे आणि ‘उबाठा’ अशा दोन्ही गटांचे आमदार आहेत. अंतिम निकाल आमच्याच बाजुने लागेल, यावर दोन्ही गटांचे आमदार ठाम आहेत. शिवाय मराठवाड्यात धाराशिव असा एकमेव जिल्हा आहे, की, येथे ठाकरे गटाचा एक आमदार आणि एक खासदार आहे.

शिंदे गटाचेही दोन आमदार आहेत. यापैकी एक जण राज्याचे आरोग्यमंत्री आहेत. बुधवारच्या निकालाबाबत दोन्ही गटांच्या आमदारांनी दावे-प्रतिदावे केले आहेत. दरम्यान, जिल्ह्यात दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांत निकालांबाबत चर्चा रंगल्याचे दिसत आहे. कार्यकर्ते अनेक दाखले देत निकाल आपल्याच गटाकडून कसा लागेल याचे स्पष्टीकरण देत आहेत. दुसऱ्या बाजूला सामान्य लोक निकालात काय येईल या उत्सुकतेत दिसत आहेत. कार्यकर्त्यांच्या चर्चा लांबून ऐकून घेत आहेत.

आम्ही व्हीप पाळला : कैलास पाटील

कळंब-धाराशिवचे आमदार कैलास पाटील आणि खासदार ओम राजेनिंबाळकर हे ठाकरे गटाचे आहेत. तर आमदार ज्ञानराज चौगुले आणि आरोग्यमंत्री तानाजी सावंत हे शिंदे गटाचे आहेत. या बाबत आमदार कैलास पाटील यांना विचारले असता, ‘आम्ही पक्षाचा व्हीप पाळला आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देशही आहेत. संवैधानिक तरतुदींवर आमचा विश्वास आहे. निकाल आमच्या बाजुनेच लागणार’’, असा दावा त्यांनी केला.

खरी शिवसेना आमचीच : ज्ञानराज चौगुले

उमरगा-लोहाऱ्याचे आमदार ज्ञानराज चौगुले यांना विचारले असता, त्यांनी सांगितले, की लोकशाहीत बहुमताला किंमत असते. खरी शिवसेना आमचीच आहे. अन्य लोक काहीही म्हणत असले तरी, आमच्या बाजुनेच निकाल लागेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची बाजू जाणून घेण्यासाठी संपर्काचा प्रयत्न केला, मात्र संपर्क होऊ शकला नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com