esakal | हिंगोलीच्या बाजार समितीत हळदीची आवक वाढली; सात हजार तीनशे रुपये क्विंटल
sakal

बोलून बातमी शोधा

हिंगोली मार्केट

हिंगोलीच्या बाजार समितीत हळदीची आवक वाढली; सात हजार तीनशे रुपये क्विंटल

sakal_logo
By
राजेश दार्वेकर

हिंगोली : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी सुरु आहे. मात्र शेतकऱ्यांना बाजार समितीत कोरोनाचे नियम पाळत खरेदी सुरु आहे. सोमवारी (ता. तीन) बाजार समितीत हळदीची आवक वाढली होती. प्रति क्विंटल सात हजार दोनशे ते सात हजार तीनशे रुपये क्विंटल प्रमाणे भाव होता.

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी संचारबंदी लागु करण्यात आली आहे. यात बहुतांश दूकाने अस्थापना बंद आहेत. मात्र शेती संबंधित येणारी काही दुकाने कोरोनाचे नियम पाळत सुरु आहेत. शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल विक्रीसाठी बाजार समिती सुरु आहे. सोमवारी (ता. तीन) येथील बाजार समितीच्या संत नामदेव मार्केट यार्डात हळदीची आवक वाढली होती. तीन हजार पाचशे क्विंटलची आवक झाली होती. तर हळदीला सात हजार दोनशे ते सात हजार तीनशे रुपये क्विंटलचा भाव होता.

हेही वाचा - जेंव्हा जिल्ह्यातील 15 मुक- कर्णबधिरांना बोलता व ऐकता यायला लागते तेंव्हा...

यासह येथे सोयाबीन सहा हजार सातशे ते सहा हजार आठशे रुपये क्विंटल भाव होता तर शंभर क्विंटल आवक झाली होती. तसेच हरभरा चार हजार ८५० ते पाच हजार ४५० क्विंटल प्रमाणे खरेदी सुरु होती. तुर सहा हजार सातशे ते सहा हजार आठशे प्रमाणे त्याची खरेदी केली जात होती. दिडशे पोते आवक झाली होती. सकाळपासून वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

दरम्यान, शेतकरी सध्या शेतमालाची विक्री करुन खरीपासाठी लागणारे खते व ईतर शेती साहित्य खरेदी करीत आहेत. यावर्षी ऐन पिक काढणीच्या वेळी अवकाळी पाऊस पडल्याने पिकाचे उत्पन्न घटले असल्याचे शेतकरी सांगत आहेत. यावर्षी हळद उत्पादक शेतकऱ्यांना ऐन हळद काढणीच्या वेळी येत असलेल्या पावसाने अडचणी येत आहेत. काही शेतकऱ्यांची हळद काढणी झाली आहे, तर काही शेतकऱ्यांची काढणीची कामे सुरु आहेत.

संपादन- प्रल्हाद कांबळे

loading image