धाराशिव जिल्ह्यातील क्रीडा संकुलांचा ३० कोटींतून होणार आता विकास

धाराशिव जिल्ह्यातील क्रीडा संकुलांचा ३० कोटींतून होणार आता विकास

जिल्ह्यातील क्रीडा संकुलांचा ३० कोटींतून होणार आता विकास

धाराशिव : ता. ३१ : जिल्ह्यात प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी क्रीडासंकुल मंजूर असलेला धाराशिव जिल्हा राज्यात एकमेव आहे. आगामी वर्षात जवळपास २८ ते ३० कोटींची कामे क्रीडा विषयावर खर्च होणार आहेत. त्यात क्रीडांगण विकास आणि खेळाडू निर्मितीवर भर राहणार आहे, अशी माहिती जिल्हा क्रीडाधिकारी श्रीकांत हरनाळे यांनी दिली आहे.

सरलेल्या वर्षात क्रीडा विभागाने जिल्ह्यातील शाळांचे क्रीडांगण विकास आणि क्रीडा साहित्यासाठी ५९ शाळांना दोन कोटी ७० लाख इतके अनुदान वाटप केले आहे. व्यायामशाळांच्या विकासासाठी ५५ शाळांसह स्थानिक स्वराज व अन्य संस्थाना एकूण २ कोटी इतके अनुदान दिले आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या मार्च २०२२च्या सुधारित शासन निर्णयानुसार, तालुका क्रीडा संकुलासाठी पाच कोटी व जिल्हा क्रीडा संकुलासाठी पंचवीस कोटी रु. वाढीव निधी मंजूर झाला आहे. त्यानुसार धाराशिव येथील तुळजाभवानी जिल्हा क्रीडासंकुलास पंधरा कोटी निधी मंजूर केला जाणार आहे.

डिसेंबर २०२३ मध्ये राज्य शासनाने २८ कोटी रकमेच्या अंदाजपत्रक व आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे. योग, महिला, युवा, क्रीडा दिनांसह क्रीडा सप्ताह, युवा महोत्सव, मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सायक्लोथॉन व वॉकेथॉन असे उपक्रम राबविले आहेत. परिणामी वातावरण निर्मिती झाली. असे हरनाळे यांनी सांगितले आहे.

तालुका क्रीडासंकुल योजना

भूम येथील तालुका क्रीडासंकुलासाठी ४ कोटी ५४ लाख रुपये रकमेच्या अंदाजपत्रक व आराखड्यास मान्यता मिळाली आहे.२ कोटी निधी मंजूर झाला आहे. जेवळी (ता.लोहारा) येथील तालुका क्रीडासंकुलास ११ कोटी ८६ लाख रुपये रकमेच्या सुधारित आराखडा व अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. १ कोटीचा निधी मंजूर केला आहे. तर कळंब येथील तालुका क्रीडासंकुलास ३ कोटी ६४ लाख रकमेच्या सुधारित आराखडा व अंदाजपत्रकास मान्यता प्राप्त झाली आहे. दीड कोटी इतका निधी मंजूर केला आहे. गुंजोटी (ता. उमरगा) येथील तालुका क्रीडासंकुलास तीन कोटी ४५ लाख रकमेच्या सुधारित आराखडा व अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता प्राप्त आहे. एक कोटी निधी मंजूर झाला आहे. तुळजापूर येथील तालुका क्रीडासंकुलास ५ कोटी ७५ लाख रकमेचा सुधारित आराखडा व अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. लवकरच निधी मंजूर होईल, असे सांगण्यात आले आहे.

सरत्या वर्षातील कामगिरी

२०२२ पासून शालेय क्रीडास्पर्धासाठी ऑनलाईन नोंदणीद्वारे स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत. यामुळे शाळा व खेळाडूंच्या सहभाग वाढला आहे. मागील वर्षी ४९५ शाळांनी व २३,६०० खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. आता यात वाढ होऊन ५६४ शाळांनी व ३५ हजार ६०० खेळाडूंनी सहभाग नोंदविला आहे. खोखो, कुस्ती, ज्युदो, हॅन्डबॉल, रग्बी, स्कॅश आदी खेळात खेळाडूंनी शालेय राष्ट्रीय स्तरावर यश मिळवले आहे.

खेलो इंडिया एक्सलन्स सेंटर

खेलो इंडिया एक्सलन्स सेंटर अंतर्गत डायट कॉलेजच्या मैदानावर खो-खो या खेळाचे प्रशिक्षण केंद्र सुरु आहे. जवळपास दीडशे खेळाडू या प्रशिक्षण केंद्रात नियमित सराव करतात. या केंद्रातील खेळाडूंनी राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय स्तरावर यश मिळवले आहे. मार्गदर्शकास मानधन व प्रशिक्षण केंद्रासाठी आवश्यक साहित्य व सूविधा दिल्या जात आहेत. या केंद्रासाठी वरील ५ लाख ६० हजार अनुदान मंजूर आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com