esakal | भोकरदनमध्ये आवळल्या चोरट्यांच्या मुसक्या । Jalna
sakal

बोलून बातमी शोधा

 thief arrested

भोकरदनमध्ये आवळल्या चोरट्यांच्या मुसक्या

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

भोकरदन : जालना येथील विवेकानंदनगर येथे जबरी चोरी करून पसार झालेल्या दोन चोरट्यांच्या गुरुवारी (ता.३०) भोकरदन पोलिसांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याकडून पाच लाख ८९ हजार १९० रोख रकमेसह तीन लाख ७७ हजार ६०९ रुपये किमतीचे सोन्याचांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

हेही वाचा: जालना: महिनाभरात अतिवृष्टीने अडीच लाख हेक्टर क्षेत्र बाधित

भोकरदन शहरातील समतानगर परिसरात दोन व्यक्ती संशयितरित्या फिरत असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक रत्नदीप जोगदंड यांना मिळाली होती. त्यानुसार जोगदंड यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी इंदलसिंग बहुरे यांना माहिती दिली. त्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक राजाराम तडवी, पोलिस नाईक अभिजित वायकोस, पोलिस कर्मचारी समाधान जगताप यांना समतानगर भागात पाठवले.

पोलिसांनी छापा टाकून संशयितांना ताब्यात घेत ठाण्यात आणले. नाव विचारले असता त्यांनी शेख आमेर शेख रमजानी (रा. मिल्लत नगर जालना) व समीर सय्यद जावेद (रा. माळीपुरा, जालना) असे सांगितले. पोलिसांनी त्यांना आणखी विचारपुस केली असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यामुळे त्यांच्या बॅगची पाहणी केली असता त्यात पाच लाख ८९ हजार १९० रोख तर लाख रुपयांच्या रोख रकमेसह तीन लाख ७७ हजार ६०९ रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने मिळून आले.

हेही वाचा: यवतमाळ : बाळ विक्री करणाऱ्या टोळीवर कारवाई केल्याने मोठा अनर्थ टळला

त्यांच्या अधिक विचारपूस केल्यानंतर रोख रक्कम व सोन्या चांदीचे दागिने जालना येथून एक घरातून बुधवारी (ता.२९) रोजी दिवसा घरफोडी करून चोरी केली असल्याचे कबूल केले. चोरी केल्यावर औरंगाबादला व नंतर रात्री भोकरदनला आल्याचे पोलिसांना सांगितले. या चोरी प्रकरणी जालना कदीम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला असून मिळून संशयित व त्यांच्या ताब्यातील चोरीचा माल कदीम जालना येथे पुढील तपासकामी दाखल करण्याची प्रक्रीया सुरु असल्याचे सहायक पोलिस निरीक्षक रत्नदीप जोगदंड यांनी सांगितले.

नागरिकांची सतर्कता आली कामी

शहरातील समतानगर भागातील पाण्याच्या टाकीवर कुणीतरी अनोळखी व्यक्ती काही तरी करीत असल्याचे या भागातील नागरिकांना आढळले. त्यांनी तात्काळ याबाबत पोलिसांना माहिती दिली. व दोन्ही संशयित चोरटे जाळ्यात अडकले. त्यामुळे येथील रहिवाशांची सतर्कता कामी आली.

loading image
go to top