वडीगोद्री येथे चोरट्यांचा धुमाकूळ ; पोलिसांकडून गोळीबार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

वडीगोद्री येथील कॉलनीत आणि गावात दोन ठिकाणी घरे फोड्या झाल्या. घरातील तिघांना शस्‍त्रांचा धाक दाखवून 50 हजार रुपये किंमतीचे सोने आणि 25 हजार रुपये लंपास केले. तर दुसर्‍या एका ठिकाणाहून 90 हजार किंमतीच्या सोन्यासह 25 हजार घेऊन 5 चोरटे फरार झाले.

वडी गोद्री (जि. जालना ) : वडीगोद्री येथे चोरट्यांनी मंगळवारी (ता.सात) पहाटे अडीचच्या सुमारास  धुमाकूळ घालत श्री गुरुदेव कॉलनीत आणि गावात दोन ठिकाणी घरे फोडली. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाल्याने चोरट्यानी पळ काढला. मात्र, पोलिस उपनिरीक्षक हनुमंत वारे यांच्या पथकाने चोरट्यांना राखण्यासाठी गोळीबार करत दोन फायर केल्या. दरम्यान, रात्रीपासून पोलिसांची शोधमोहिम सुरु आहे.

वडीगोद्री येथील कॉलनीत आणि गावात दोन ठिकाणी घरे फोड्या झाल्या. घरातील तिघांना शस्‍त्रांचा धाक दाखवून 50 हजार रुपये किंमतीचे सोने आणि 25 हजार रुपये लंपास केले. तर दुसर्‍या एका ठिकाणाहून 90 हजार किंमतीच्या सोन्यासह 25 हजार घेऊन 5 चोरटे फरार झाले. त्यानंतर गावकर्‍यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तत्‍काळ घटनास्‍थळी दाखल होत चोरट्यांचा पाठलाग केला.  

यादरम्यान पोलिस उपनिरीक्षक हनुमंत वारे यांनी चोरट्यांचा पाठलाग करताना त्यांना रोखण्यासाठी गोळीबार करत दोन फायर केल्या. परंतु चोरटे औरंगाबाद-सोलापूर महामार्गावरून पळून गेले. त्यानंतर डॉग स्‍कॉड आणि ठसे तज्‍ज्ञांना पाचारण करण्यात आले असून रात्रीपासून चोरट्यांचा पोलिस शोध घेत आहेत.

Web Title: theft in Vadigodri Firing from police