चोरीला गेलेल्या गाड्या सहसा कधीच सापडत नाहीत, पण लातुरात मात्र...

सुशांत सांगवे
मंगळवार, 14 जानेवारी 2020

  • चोरीला गेलेल्या तब्बल ५४ दुचाकी जप्त
  • लातूरच्या पोलिस पथकाची कामगिरी
  • सराईत टोळीत विद्यार्थ्यांचाही समावेश

लातूर : शहरात दुचाकी चोरायची. ती ग्रामीण भागात जाऊन कमी किमतीत विकायची. सुरवातीला खरेदीदाराकडून आगाऊ रक्कम घ्यायची. कागदपत्रे दिल्यानंतर उर्वरित रक्कम द्या, असे म्हणायचे. आगाऊ रक्कम घेऊन तिथून पळ काढायचा... अशा दोन टोळ्यातील सराईत चोरट्यांना पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्यांच्याकडील तब्बल ५४ जप्त केल्या आहेत. विशेष म्हणजे, या टोळ्यांत शालेय विद्यार्थ्यांचा समावेश असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

लातूर शहर उपविभागातील विशेष पथकाला जिल्ह्यात मोटार सायकल चोरी करणाऱ्या टोळीचा सुगावा लागला. त्यानुसार पोलिसांनी सरफराज उस्मान शेख (वय २३, इस्लामपूरा) यास ४ जानेवारी रोजी अटक केली.

त्याची विचारपूस केल्यानंतर गजेंद्र शिवराज सरवदे (वय २९, रा. भीमनगर, कासारशिरसी) या साथीदाराच्या मार्फत लातूर शहरातील २६ मोटार सायकलची चोरी केल्याचे समोर आले. त्यामुळे या दुचाकी निलंगा, कासारसिरसी, औराद, बस्वकल्याण, नांदेड (कंधार), परभणी (पालम) येथून जप्त करण्यात आल्या.

इब्राहिमखान गारद्याचे अस्सल चित्र औरंगाबादेत, मूळ गाव कोणते? 

या चोरीचा तपास करीत असताना पोलिसांना आणखी एका टोळीची माहिती मिळाली. त्यानूसार पथकातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना टोळीच्या शोधासाठी विविध भागात रवाना करण्यात आले. या पथकाने परवेज अजमोद्दीन मुजावर (रा. कासार शिरसी), अदनान नासीर पठाण (रा. लातूर), शादाब आयुब पठाण (रा. लातूर), मलंग हैदर मुत्रे (रा. कासारशिरसी) यांना अटक केली.

त्यांच्याकडून लातूर जिल्ह्यात चोरीला गेलेल्या २७ दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या. या दोन्ही टोळीकडील १६ लाख २० हजार रुपयांच्या एकुण ५४ दुचाकी पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. या दोन्ही टोळीतील चोरट्यांचा कसून तपास केला जात आहे. त्यामुळे चोरीला गेलेल्या आणखी काही दुचाकी सापडतील, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

पेशव्यांचा हा मुलगा का झाला मुस्लीम? जाणून घ्या... 

या पथकात सहाय्यक पोलिस निरिक्षक विलास नवले, पोलिस उपनिरिक्षक किरण पठारे, आर. बी. ढगे, वहिद शेख, माधव बीलापट्टे, अभिमन्यू सोनटक्के, महेश पारडे, नागनाथ नराळे, सोमनाथ खडके यांचा समावेश होता. दरम्यान, जून्या दुचाकीची खरेदी-विक्री करताना नागरिकांनी कागदपत्रांची शहानिशा न करता आर्थिक व्यवहार करू नये, असे आवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन सांगळे यांनी केले.

या ठिकाणी आहे थोरले बाजीरावांची समाधी, झाली दुरवस्था, पाहा PHotos


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Theft Vehicles Seized By Latur Police Breaking News