मंदीरफोडीतील अट्टल चोरट्यास अटक

प्रल्हाद कांबळे
बुधवार, 18 मार्च 2020

स्थानिक पोलिस शाखेच्या पथकाने मंगळवारी (ता. १७) सायंकाळच्या सुमारास केली. विमानतळ पोलिसांनी त्याला न्यायालयासमोर हजर केले. 

 

नांदेड : शहराला लागूनच असलेल्या सांगवी परिसरातील श्‍याम मंदीर फोडीतील फरार आरोपीला अखेर अटक करण्यात आली. ही कारवाई स्थानिक पोलिस शाखेच्या पथकाने मंगळवारी (ता. १७) सायंकाळच्या सुमारास केली. विमानतळ पोलिसांनी त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याची रवानगी पोलिस कोठडीत केली आहे. 

शहर व जिल्‍ह्यातील विविध गंभीर गुन्ह्यात पाहिजे असलेल्या आरोपींना अटक करून गुन्ह्याला आळा घालण्याच्या सुचना पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी जिल्ह्यातील सर्वच ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच फरार व पाहिजे असलेल्या गुन्हागारांची धरपकड करून त्यांची दहशत कमी करणय्साठी कठोर पाऊले उचला अशा सक्त सुचना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांना दिल्या. यावरून श्री. चिखलीकर यांनी आपल्या सर्वच अधिनस्त अधिकाऱ्यांची बैठक घेऊन योग्य त्या सुचना दिल्या. 

हेही वाचा - ‘या’ शहरातील वाहतुकीची समस्या कशी सुटेल...? वाचा..

एपीआय तथा इनकाऊन्टर फेम पांडुरंग भारतीची कारवाई

यावरून नांदेड शहरात गस्त घातल असतांना सहाय्यक पोलिस निरीक्षक तथा इनकाऊन्टर फेम पांडुरंग भारती यांना मंदीर चोरीतील फरार आरोपीची माहिती मिळाली. त्यांनी आपले सहकारी सहाय्यक फौजदार जसवंतसिंग शाहु, अब्ल रब, हवालदार मारोती तेलंग, शंकर म्हैसनवाड, सखाराम नवघरे, बालाजी तेलंग, तानाजी येळगे, मोतीराम पवार आणि बजरंग बोडके यांना सोबत घेऊन श्‍याम मंदीर फोडणारा फरार बापूराव यलप्पा गोरे रा. मगनपूरा याला त्याच्य राहत्या घरातून मंगळवारी (ता. १७) सायंकाळच्या सुमारास ताब्यात घेतले. त्याच्याकडून शाम मंदीरातून चोरली रक्कमही जप्त केली.
 
विमानतळ पोलिसांच्या स्वाधीन केले

त्याच्याविरुद्ध विमानतळ पोलिस ठाण्यात मंदीरफोडीचा गुन्हा दाखल करणय्त आला होता. त्याच्या दोन साथिदाराला यापूर्वीच अटक केली होती. सध्या ते दोघेही जामीनावर आहेत. बापूराव गोरे याला विमानतळ पोलिसांच्या स्वाधीन केले. त्याची अधिकची चौकशी करून पोलिसांनी बुधवारी (ता. १८) न्यायालयासमोर हजर केले. यावेळी न्यायालयाने त्याला पोलिस कोठडीत पाठविले आहे. त्याच्याकडून अजून काही घरफोडी व मंदीरफोडीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता उपविभागीय पोलिस अधिकारी (शहर) अभिजीत फस्के यांनी विश्‍वास व्यक्त केला. 

येथे क्लिक करा - ‘कोरोना’च्या धास्तीमुळे गावकरी, विद्यार्थी परतले

कोरोनामुळे काही रेल्वेगाड्या रद्द

नांदेड : कोरोना या जीवघेण्या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी मध्य रेल्वेने काही गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महत्वाच्या सहा रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाकडून दिलेल्या प्रसिद्धीपत्रानुसार देण्यात आली आहे. 

रद्द करण्यात आलेल्या गाड्या पुढीलप्रमाणे 

ँ गाडी क्रमांक ११२०१ लोकमान्य टीळक टर्मीनस ते अजनी (नागपूर) ता. २३ मार्च ते ३० मार्च.
ँ गाडी क्रमांक ११२०२ अजनी (नागपूर) ते लोकमान्य टीळक टर्मीनस ता. २० मार्च ते २७ मार्च.
ँ गाडी क्रमांक ११२०५ लोकमान्य टीळक टर्मीनस ते कामारेड्डी ता. २१ मार्च ते २८ मार्च. 
ँ गाडी क्रमांक ११२०६ कामारेड्डी ते लोकमान्य टीळक टर्मीनस ता. २२ मार्च ते २९ मार्च. 
ँ गाडी क्रमांक ११४०१ सीएसएमटी मुंबई ते नागपूर ता. २३ मार्च ते एक एप्रील.
ँ गाडी क्रमांक ११४०२ नागपूर ते सीएसएमटी मुंबई ता. २२ मार्च ते ३१ मार्च. 
        


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: thefts arrested in temple crime news nanded