esakal | त्यांचा २५० किलोमीटरचा पायी प्रवास
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

कोरोनामुळे सर्वत्र संचारबंदी, लॉकडाउन करण्यात आल्यामुळे परराज्यातून कामासाठी आलेले कामगार अडकले आहेत. कर्नाटकातील बेल्लारी येथे रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांना पाथरी येथे थांबविण्यात आले.

त्यांचा २५० किलोमीटरचा पायी प्रवास

sakal_logo
By
धनंजय देशपांडे

पाथरी (जि.परभणी) : ‘लोकडाउन’मुळे सोलापूर ते वाशीम पायी प्रवास करणाऱ्या कामगारांना परभणी-बीड जिल्ह्याच्या सीमेवर गुरुवारी (ता.दोन) पाथरी प्रशासनाने थांबविले. या वेळी नऊ मजुरांना प्रशासनाने होम क्वारंटाइन केले. जवळपास त्यांनी सोलापूर ते पाथरी असा २५० किलोमीटरचा पायी प्रवास केला.

कर्नाटकातील बेल्लारी येथे रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांना त्यांच्या मुकदमाने ता. २२ मार्च रोजी महाराष्ट्र सीमेवर आणून सोडले होते. मूळचे जउळका (रेल्वे) (ता. मालेगाव जि. वाशीम) येथील नऊ मजूर संचारबंदी सुरू झाल्यावर सोलापूरपासून ३० किलोमीटर अंतरावर कर्नाटक सीमेवर दाखल झाले. लॉकडाउननंतर वाहतूकही बंद झाल्याने मजूर कसेबसे सोलापूरपर्यंत पोचले. त्यानंतर त्यांना कोणतेही वाहन न मिळाल्याने हे मजूर घराच्या ओढीने सोलापूर-तूळजापूर-उस्मानाबाद-कळंब-केज- धारूरमार्गे गुरुवारी परभणी-बीड जिल्ह्याच्या सीमेवरील ढालेगाव (ता. पाथरी) या चेकपोस्टवर अडकले. 

हेही वाचा व पहा - Video: भाविकांविनाच ‘श्रीराम’जन्मोत्सव


 मजुरांची राहण्याची पाथरीत व्यवस्था
या चेकपोस्टवर कर्तव्यास असलेले फौजदार ती. ई. कोरके यांनी या पायी जाणाऱ्या मजुरांना थांबविले. या बाबत प्रशासनाला माहिती दिली. यानंतर प्रशासनाने  २५० किलोमीटर पायी प्रवास करणाऱ्या नऊ मजुरांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना होम क्वारंटाइन करत पाथरी शहरातील नेताजी सुभाष विद्यालयात या मजुरांची राहण्याची व्यवस्था केली आहे.

हेही वाचा -  आता परभणीच्या सुरक्षेत वाढ !
हेही वाचा ...

चढ्या दराने विक्री करणाऱ्यांवर
प्रशासनाचा कार्यवाहीचा इशारा

 

पाथरी (जि.परभणी) : लॉकडाउनच्या संधीचा फायदा घेत किराणा दुकानदार शॉर्टेजच्या नावाखाली किराणामाल चढ्या दराने विक्री करत असल्याच्या तक्रारी आल्याने पाथरीचे तहसीलदार कांगने यांनी जीवनावश्यक वस्तू चढ्या भावाने विकणाऱ्या दुकानदारांवर कठोर कार्यवाही करण्याचा इशारा दिला आहे.
देशासह राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून मागील सहा दिवसांपासून लॉकडाउन सुरू आहे. या कालावधित वैद्यकीय सेवेसह, किराणा, भाजीपाला ही दुकाने विशिष्ट कालावधीत सुरू आहेत. संकटाच्या या काळात शहरासह ग्रामीण भागातील किराणा दुकानदार चढ्या दराने मालाची विक्री करत असल्याच्या तक्रारी अनेक नागरिकांनी केल्याने तहसीलदार कांगने यांनी जीवनावश्यक वस्तूचा साठा व तो माल चढ्या भावाने विकू नये, असे आवाहन केले असून असा प्रकार आढळून आल्यास अशा दुकानदारांवर जीवनावश्यक वस्तू अधिनियमान्वये कठोर कार्यवाही करण्याचा इशारा दिला आहे.