महावितरणच्या भरती प्रक्रियेत ओबीसींवर अन्याय नाही

प्रल्हाद कांबळे
मंगळवार, 16 जुलै 2019

- महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी महावितरणतर्फे पाच हजार वीज सहायकांच्या पदांसाठी सुरु करण्यात आलेल्या भरती प्रक्रियेत ओबीसी वर्गावर कुठलाही अन्याय झालेला नाही.

- एका तांत्रिक त्रुटीमुळे जाहिरातीत एका वर्गाची पदसंख्या दुस-या वर्गाच्या रकान्यात छापली गेली.

- परंतु ही चूक लक्षात येताच ती लगेच सुधारण्यात आलेली आहे, असे महावितरणने स्पष्ट केले आहे.

नांदेड : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी महावितरणतर्फे पाच हजार वीज सहायकांच्या पदांसाठी सुरु करण्यात आलेल्या भरती प्रक्रियेत ओबीसी वर्गावर कुठलाही अन्याय झालेला नाही. एका तांत्रिक त्रुटीमुळे जाहिरातीत एका वर्गाची पदसंख्या दुस-या वर्गाच्या रकान्यात छापली गेली. परंतु ही चूक लक्षात येताच ती लगेच सुधारण्यात आलेली आहे, असे महावितरणने स्पष्ट केले आहे.

महावितरणने (ता. नऊ) जुलैला आपल्या संकेतस्थळावर भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली. यामध्ये ओबीसींसाठी एक्क्याऐंशी जागा दर्शविण्यात आल्या होत्या. आरक्षणाप्रमाणे एक हजार 507 पद असायला हवे होते. काही वेळानंतरच ही चूक महावितरणच्या लक्षात आली.

दुस-या दिवशी सुधारित  जाहिरात प्रकाशित करण्यात आली. यात ओबीसींच्या एक हजार 507 पदांसाठी अर्ज मागवण्यात आले. त्यामुळे अन्यायाचा पश्नच येत नाही.

दरम्यान अनेक ओबीसी संघटनांनी या विषयाला मुद्दा बनवला. ओबीसी आरक्षणाला छेडल्याचा आरोप करण्यात आला. परंतु हे सर्व केवळ एका त्रुटीमुळे झाले असून ती सुधारण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: there is no injustice to OBCs in MSEDCL s recruitment process