esakal | या चार तालुक्यात १० हजारावर नागरिक होम क्वारंटाईन
sakal

बोलून बातमी शोधा

Nanded Photo

नांदेड शहर तसेच जिल्ह्यातील उपजिल्हा, ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सुविधा आणि औषधांचा साठा वाढविण्यात यावा अशा सूचना खासदार हेमंत पाटील यांनी चार दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी यांना केल्या आहेत. 

या चार तालुक्यात १० हजारावर नागरिक होम क्वारंटाईन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदेड : कोरोनाच्या धास्तीने आणि वाढत्या प्रसारामुळे संपूर्ण जग हादरून गेले आहे. प्रशासन योग्य ती खबरदारी घेत आहे. हिंगोली लोकसभा मतदार संघातील हदगाव, हिमायनगर, माहूर, किनवट तालुक्यातील आरोग्य केंद्राची खासदार हेमंत पाटील यांनी पाहणी केली. नागरिकांनी कोरोना विषाणू बाबत काळजी घेऊन प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. वरील चार तालुक्यात मिळून तब्बल १० हजार ५४९ नागरिकांना आरोग्य विभागाने होम क्वारंटाईन केले आहे.  
 
भारतात मागील ११ दिवसांपासून सर्वत्र लॉक डाऊन करण्यात आले असून, कोरोना विषाणूचा प्रसार आणि प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन योग्य ती खबरदारी घेत आहे. ३० मार्चनंतर कोरोना बाधितांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविल्यामुळे राज्यचा आरोग्य विभाग आणि प्रशासन आणखी खबरदारीने कामाला लागले आहे. नांदेड शहर तसेच जिल्ह्यातील उपजिल्हा, ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सुविधा आणि औषधांचा साठा वाढविण्यात यावा अशा सूचना खासदार हेमंत पाटील यांनी चार दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी यांना केल्या आहेत. 

हेही वाचा- इतिहासात दुसऱ्यांदा रेल्वेची धडधड थांबली, कशी? ते वाचलेच पाहिजे

त्यांना होम क्वारंटाईन सूचना
नांदेड जिल्ह्यातील व हिंगोली लोकसभा मतदार संघात समाविष्ट असणाऱ्या किनवट, माहूर, हदगाव, हिमायतनगर तालुक्यातील उपजिल्हा, ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी खासदार पाटील यांनी केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या खबरदारी व उपाययोजनांची श्री. पाटील यांनी माहिती घेतली. तालुक्यात बाहेर देशातून, परराज्यातून, मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक अशा मोठ्या शहरांतून येणाऱ्या नागरिकांची पुरेपूर माहिती घेऊन त्यांना होम क्वारंटाईन करण्यासोबतच योग्य त्या उपचाराबाबाबत सूचना केल्या आहेत.  त्यानुसार किनवट मध्ये दोन हजार १०८, माहूर दोन हजार ९९६, हदगाव तीन हजार ८५३ तर हिमायतनगर मध्ये एक हजार ५९२  नागरिकांना होम क्वारंटाईन मध्ये ठेवण्यात आल्याचे समजते.

हेही वाचले पाहिजे- सहा हजार गावकऱ्यांच्या आरोग्यासाठी ग्रामपंचायतीचा पुढाकार

नागरिकांनी घरातच थांबावे व प्रशासनास सहकार्य करावे​
यावेळी खासदार हेमंत पाटील यांनी नागरिकांना सुद्धा कोरोना विषाणू बाबत गांभीर्याने घेऊन दक्षता घेण्याचे आवाहन केले . ते म्हणाले की, हा विषाणू खूपच गंभीर स्वरूपाचा असून संपुर्ण जग या आजाराने हादरून गेला आहे. भारतात आणखी  प्रसार वाढू नये म्हणून नागरिकांनी घरातच थांबावे व प्रशासनास सहकार्य करावे. यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अविनाश भोसीकर, तहसीलदार दापकर, तालुका प्रमुख शामराव चव्हाण, आकाश रेड्डी, डॉ.दत्ता काळे, डॉ. सोमेश्वर पतंगे आदी उपस्थित होते.

loading image