या गावांत भूगर्भातून आवाज येतो तेव्हा

File photo
File photo

नांदेड : पावसाचे जास्त प्रमाण असल्यास भूगर्भात जमा होणारे पाणीसाठे आणि जमिनीतील फॉल्ट तथा प्लेटांचे घर्षण, बेसॉल्ट खडक, अंतर्गत खनिज यांच्याशी संयुग होऊन मुक्त होणाऱ्या वायूमुळे हे आवाज निर्माण होतात. ही नैसर्गिक प्रक्रिया असून अशी परिस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांनी न घाबरता सावधगिरी बाळगण्याचे आवाहन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील भौतिकी विभागाचे वरिष्ठ सहयोगी प्राध्यापक डॉ. टी. विजयकुमार केले आहे.

मुखेड तालुक्यात हिब्बट आणि लोहा तालुक्यात माळाकोळी येथे भूगर्भातील आवाज आणि भूकंपाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी प्रा. डॉ. टी. विजयकुमार यांच्यासोबत नुकतीच चर्चा केली. या वेळी डॉ. विजय कुमार यांनी नागरिकांना आवाहन केले. जमिनीत होणाऱ्या आवाजांची नोंद ही भूकंपमापक यंत्रावर होत नसून भूकंपाच्या तीव्रतेची नोंद होते, असे सांगितले.  

जिल्हा प्रशासनाने वेळीच घेतली दखल

हिब्बट आणि माळाकोळी येथे जमिनीतून ध्वनिक उत्सर्जन आणि भूकंपाच्या हालचाली वारंवार अनुभवण्यात येत असल्याने जिल्हा प्रशासनाने वेळीच याची माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण मंत्रालय मुंबई, भूकंप अन्वेषण केंद्र केंद्रीय पृथ्वी विज्ञान विभाग नवी दिल्ली आणि भारतीय भू-वैज्ञानिक सर्वेक्षण नागपूर यांना वेळोवेळी निदर्शनास आणून दिले असून यावर संशोधन सुरू आहे.

भूगर्भाची होतेय स्कॅनिंग

जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी नुकतेच ता. २५ नोव्हेंबर रोजी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात प्रा. डॉ. टी. विजय कुमार यांच्यासोबत एक तास चर्चा केली. नांदेड आणि सभोवतालचा प्रदेश हा सेस्मिक झोन- दोन या श्रेणीत येत असून सोलापूर पासून तेलंगना राज्यातील बोधनपर्यंत संपूर्ण भूगर्भाची स्कॅनिंग होत असल्याची आणि ठिकठिकाणी याचे केंद्र उभारण्यात येत असल्याची माहिती त्यांनी या वेळी दिली. ग्रामीण भागातील अनेक घर कच्चे आणि पत्र्यांचे असतात, तसेच त्यावर मोठे लाकडाचे ओडके, खोड किंवा वजनदार दगड ठेवलेले असतात. ते अतिशय धोकादायक ठरतात. कारण भूकंपाच्या वेळी हे खाली पडून मोठी जीवितहानी करतात. 

नागरिकांनी सावध राहावे

दोषपूर्ण बांधकाम हे भूकंपात फार जास्त धोकादायक ठरतात. भूकंपाच्या वेळी सावध राहणे हेच सगळ्यात जास्त महत्त्वाचे असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांनी दिली.  

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com