ते १२ जण नांदेडसाठी धोकादाय तर ठरणार नाहीत ना...?

शिवचरण वावळे
रविवार, 5 एप्रिल 2020

सुदैवाने आत्तापर्यंत नांदेड जिल्ह्यात एकही व्यक्ती कोरोना बांधित नाही. मात्र, इंडोनेशियाहून परत आलेल्या त्या १२ जणांना पोलिस विभागाने शोधुन काढुन त्यांना विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण सासकीय रुग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. 

नांदेड : शहरात आत्तापर्यंत गाव खेड्यातील हजारो रहिवाशी ‘कोरोना’च्या भीतीने शहरत परतले आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाकडून त्यांची घरोघरी जाऊन विचारपूस केली जात आहे. शिवाय ग्रामसेवक, सरपंच, तलाठी, पोलिस पाटील, आशा वर्कर यांना देखील कुणी नवीन आले का, याबद्दल ठिकठिकाणी विचारणा करण्यात येत आहे. 

संशयितांवर बारिक नजर ठेवण्यात येत आहे. दोन दिवसांपूर्वी दिल्ली येथील तबलिकी कार्यक्रमाहून परत आलेल्या संशयित व्यक्तींमुळे जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासनाची तारांबळ उडाली होती. नांदेडकरांची देखील झोप उडाली होती. परंतु, सुदैवाने आत्तापर्यंत नांदेड जिल्ह्यात एकही व्यक्ती कोरोना बांधित नाही. मात्र, इंडोनेशियाहून परत आलेल्या त्या १२ जणांना पोलिस विभागाने शोधुन काढुन त्यांना विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण सासकीय रुग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. 

हेही वाचा- कोवीड-19 : वंचितकडून मोफत रुग्णवाहिका लोकार्पण

अहवाल निगेटीव्हच यावा अशी मनोमन प्रार्थना​

रविवारी (ता.पाच) एप्रिल रोजी त्यांच्या घशातील लाळेचे ‘स्वॅब’ घेऊन पुणे येथे पाठविण्यात आले आहेत. परंतु, त्यांच्या स्वॅबचा रिपोर्ट येण्यापूर्वीच ते बाराजण नांदेडसाठी धोकादायक तर ठरणार नाहीत ना, अशी धास्तीच जणू जिल्हा प्रशासन, पोलिस विभाग आणि नांदेडकरांनी घेतली आहे. सोमवारी (ता.सहा) एप्रिलला सायंकाळी या बारा संशयितांच्या स्वॅबचा अहवाल प्राप्त होण्याची शक्यता असून, त्यांचा अहवाल निगेटीव्हच यावा अशी मनोमन प्रार्थना देखिल नांदेडकरांकडून केली जात आहे.  

सोमवार पर्यंत रिपोर्ट येण्याची शक्यता

नांदेड शहरातून रोज आठ ते दहा संशयितांची टेम्परेचर तपासणी करण्यात येत आहेत. तपासणी झाल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून तपासणी केलेल्या संशयित व्यक्तींचे ‘स्वॅब’ पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात येत आहेत. काही दिवसांपूर्वी इंडोनेशियाहून नांदेड शहरात दाखल झालेल्या १२ संशयित व्यक्तींना नांदेड पोलिस विभागाने शोधुन आणलेल्या त्या सर्वांचे स्वॅब घेऊन रविवारी (ता.पाच) पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

हेही वाचा- भाग दोन : ‘अशी’ घ्यावी शेतमालाची व वैयक्तिक काळाजी

आयुर्वेदिकच्या आयसोलेशन वार्डातील पाच जणांचा अहवाल निगेटीव्ह
इंडोनेशियाहून परतलेले ते बारा संशयित आणि पूर्वीचे तीन असे एकुण १५ संशयित सध्या विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात दाखल आहेत. तर दुसरीकडे शासकीय आयुर्वेदिक रुग्णालयातील आयसोलेशन वार्डामध्ये पाच जण ठेवण्यात आले आहेत. मात्र या पाचही जणांचा पूर्वीच स्वॅब अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाला आहे. त्यामुळे त्यांच्याकडून कुठलीही भिती नसल्याचे सांगतिले जात आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: They Will Not Be A Threat To Nanded will they Nanded News