अन्‌ त्याने निर्वस्त्र होऊन केली चोरी 

Aurangabad
Aurangabad

दौलताबाद : चोरी करताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसलो तरी पकडले जाऊ नये, यासाठी चोराने वेगळी शक्‍कल लढवत चेहरा रुमालाने बांधून निर्वस्त्र होत येथील बसस्थानक परिसरातील एका हॉटेलमध्ये चोरी केली. 

दौलताबाद (ता.औरंगाबाद, जि.औरंगाबाद) येथील बसस्थानक परिसरात जय योगेश्वर नावाचे चहा-नाष्ट्याचे हॉटेल आहे. सोमवारी (ता. 21) पहाटे साडेपाचच्या दरम्यान चोरट्याने निर्वस्त्र अवस्थेत हॉटेलच्या गच्चीचे दार तोडून आत प्रवेश केला. त्याने हॉटेलमधील रोख रक्‍कम व काही साहित्य चोरी करत धूम ठोकली. हा सर्व प्रकार हॉटेलमध्ये लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत दौलताबाद पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली नव्हती. 

आपली चोरी उघडकीस येऊ नये, यासाठी चोरटे वेगवेगळ्या कल्पना आणि पद्धतींचा उपयोग करतात. काही चोऱ्यांचा उलगडा होतो; तर काही चोऱ्यांचे काहीच धागेधोरे सापडत नाहीत. दौलताबाद येथे चोरी करण्यासाठी चोरट्याने निवडलेली नवीन पद्धत दिवसभर चर्चेचा विषय होती. या अगोदरही दौलताबाद परिसरात चोरीच्या अनेक घटना घडल्या आहेत. दुष्काळी परिस्थिती व हाताला काम नसल्यामुळे परिसरात चोऱ्या वाढत असल्याची चर्चा परिसरात होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com