गावाच्या सीमेवरच पकडले मुर्तीचोर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 ऑगस्ट 2019

धनेगाव (ता. देवणी) येथील महादेव मंदिरातील पुरातन मुर्ती चोरी झाल्यानंतर ग्रामस्थांनी चोरांना गावाच्या सीमेवरच पकडले हा प्रकार बुधवारी (ता. 28) सांयकाळी घडला. 

देवणी(जि. लातूर) ः धनेगाव (ता. देवणी) येथील महादेव मंदिरातील पुरातन मुर्ती चोरी झाल्यानंतर ग्रामस्थांनी चोरांना गावाच्या सीमेवरच पकडले हा प्रकार बुधवारी (ता. 28) सांयकाळी घडला. 

धनेगाव येथे मांजरा नदिकाठी महादेवाचे पुरातन मंदिर असुन नवसाला पावणारा देव म्हणुन या मंदिराची ख्याती आहे. मांजरा नदिकाठचा निसर्गरम्य परिसर, नव्याने झालेले बॅरेज, निंलगा उदगीर राज्यमार्ग यामुळे मंदिरास मोठे महत्व आहे. मंदिरात महादेवाचे पिंड व मुर्ती असुन बुधवारी सांयकाळी मंदिरातील महाद्वाराचे कुलुप तोडुन चोरट्यांनी मुर्तीची चोरी केली.

चोरटे आपली दुचाकी घेऊन निंलगा उदगीर राज्यमार्गावहुन वलांडीच्या दिशेने निघाले. मात्र गावाच्या सिमेवरच धनेगाव लमाणतांड्याजवळ त्यांची दुचाकी बंद पडली. बराच प्रयत्न करुनही दुचाकी सुरुच होत नव्हती. त्यांच्या संशयास्पद हालचाली पाहुन नागरीकांनी त्यांची विचारपुस सुरु केली. त्यानंतर मुर्ती चोरीची घटना उघडकीस आली.

ग्रामदैवतेच्या मुर्तीची चोरी झाल्याचे लक्षात येताच धनेगावसह परिसरातील नागरीकांनी चोरांना चांगलाच चोप दिला. पोलिसांनी वेळीत हस्तक्षेप करत चोरट्यांना ताब्यात घेतले. हैदर इस्माईल शेख (वय 25) व नबी काशिम शेख (वय 50, दोघेही रा. तुगाव, भालकी, जि. बीदर, कर्नाटक) अशी चोरट्यांची नावे असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्याची प्रक्रीया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: thief caught