शस्त्राचा धाक दाखवून साडेपाच लाखांचा ऐवज लुटला

कमलेश जाब्रस
गुरुवार, 10 मे 2018

शहरातील सन्मित्र कॉलनीत भागातील पाटील गल्लीतील अनिल लिंबगांवकर हे लग्नानिमीत्त बुधवारी (ता. नऊ) बाहेरगावी गेले. रात्री उशिरा परतल्यानंतर झोपेत असताना चोरट्यांनी घराच्या पाठीमागील दरवाजा तोडुन आत प्रवेश केला.

माजलगांव (जि. बीड) : शहर आणि तालुक्यात चोऱ्यांच्या घटनांत वाढ झाली असून गुरुवारी (ता. १०) पहाटे शहरातील दोन ठिकाणी साडेपाच लाखांचा ऐवज लुटला. एका ठिकाणी शस्त्राचा धाक दाखविण्यात आला. घटनास्थळी श्वान पथक दाखल झाले.

शहरातील सन्मित्र कॉलनीत भागातील पाटील गल्लीतील अनिल लिंबगांवकर हे लग्नानिमीत्त बुधवारी (ता. नऊ) बाहेरगावी गेले. रात्री उशिरा परतल्यानंतर झोपेत असताना चोरट्यांनी घराच्या पाठीमागील दरवाजा तोडुन आत प्रवेश केला.

धारदार शस्त्राचा धाक दाखवुन सोने, चांदीचे दागिने व रोख रक्कम असा साडे पाच लाख रूपयांचा एैवज लंपास केला. तर, जवळच राहणा-या अनिल पुरबुज यांच्या घराचा देखिल दरवाजा तोडुन आत प्रवेश करत मणी मंगळसुत्र व रोख आठ हजार रूपये असा एैवज लंपास केला आहे. तालुक्यातील लहामेवाडी, मंजरथ याठिकाणी देखिल तीन - तीन घरे फोडल्याच्या घटना घडल्या आहेत. तर शहरात देखिल चो-यांचे प्रमाण वाढत असतांना पोलिसांना मात्र या चो-या रोखण्यात अपयश आले आहे. 

Web Title: thief in Majalgaon