सराफा दुकानात चोरी; पंधरा लाखांचा ऐवज लंपास 

प्रल्हाद कांबळे
रविवार, 2 जून 2019

सारखणी येथील शाम कंवरसिंह माळवी यांच्या मालकीचे तुळजाई ज्वेलर्सची दुकान आहे. त्यांनी नेहमीप्रमाणे आपली दुकान शुक्रवारी (ता. ३१) रात्री बंद करून आपल्या घरी गेले. शनिवारी (ता. एक) पहाटे चार ते पाचच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी लोखंडी हत्याराने दुकानाचे शटर वाकवून दुकानात प्रवेश केला.

नांदेड : सारखणी (ता. माहूर) येथील सराफा दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्या- चांदीचे दागिने असा पंधरा लाखाचा ऐवज लंपास केला. ही घटना शनिवारी (ता. एक) पहाटे पाचच्या सुमारास घडली. यामुळे परिसरातील व्यापारी भयभीत झाले आहेत. 

सारखणी येथील शाम कंवरसिंह माळवी यांच्या मालकीचे तुळजाई ज्वेलर्सची दुकान आहे. त्यांनी नेहमीप्रमाणे आपली दुकान शुक्रवारी (ता. ३१) रात्री बंद करून आपल्या घरी गेले. शनिवारी (ता. एक) पहाटे चार ते पाचच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी लोखंडी हत्याराने दुकानाचे शटर वाकवून दुकानात प्रवेश केला. गल्ल्यातील नगदी चार लाख, आठ लाख ९० हजार ५०० रुपये किंमतीचे २७४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिणे आणि दोन लाख चार हजार ३७५ रुपयाचे साडेपाच किलो वजनाचे चांदीचे दागिणे असा १४ लाख ९४ हजार ८७५ रुपयाचा ऐवज लंपास केला.

ही बाब सकाळी दुकान उघडण्यासाठी आल्यानंतर मालक माळवी यांच्या लक्षात आली. त्यांनी लगेच सिंदखेड पोलिस ठाणे गाठून दुकानात चोरी झाल्याचे पोलिसांना सांगितले. यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक एम. डी. शिवरकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळ गाठले. पंचनामा करून शआम माळवी यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्यांविरूध्द घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास शिवरकर हे करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: thief in Nanded