पनवेल एक्सप्रेसमधून महिला प्रवाशाची आठ लाखांची बॅग लंपास

crime
crime

नांदेड : पुणे ते नांदेड प्रवासादरम्यान पनवेल एक्स्प्रेसमधून एका महिला प्रवाशाची बॅग लंपास करण्यात आली असून, यामध्ये साधारण आठ लाख रुपयांचा मुद्देमाल होता.

नांदेड शहरातील विवेक नगर भागात राहणाऱ्या करुणा भारत टेकाळे या महिला आपल्या आई समवेत पुणे ते नांदेड पनवेल एक्सप्रेसने एस7 डब्यातील 71 आसन क्रमांकावरून 12 फेब्रुवारी रोजी निघाल्या. लातूर रोड ते नांदेड च्या दरम्यान बुधवारी पहाटे चारच्या सुमारास त्यांच्या डोक्याखाली असलेली हाती रंगाची पर्स अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. ही बाब त्यांना पूर्णा ते नांदेड दरम्यान लक्षात आली.

सदर पर्समध्ये आठ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने व रोख पाच हजार रुपये असा आठ लाख पाच हजारांचा ऐवज असलेली पर्स चोरट्यांनी लंपास केली. नांदेड येथे उतरल्यानंतर करुणा टेकाळे यांनी लोहमार्ग पोलिस ठाणे गाठले. यांच्या फिर्यादीवरून नांदेड लोहमार्ग ठाण्यात गुन्हा दाखल करून पुढील तपासासाठी परळी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com