वसमतमध्ये तीन लाखांचा ऐवज पळविला

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 26 मे 2019

घरात प्रवेश करताच घरातील साहित्य अस्ताव्यस्त पाहून घरात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने वसमत शहर पोलिसांना घटनेची माहिती दिली. शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक रवींद्रसिंग धुन्ने, उपनिरीक्षक श्री. मराडे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

हिंगोली : वसमत येथील नविन मोंढा भागामध्ये घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सुमारे तीन लाख रुपयांचा ऐवज पळविल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शनिवारी ( ता. २५) रात्री उशिरा वसमत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार येथील नवा मोंढा भागात नीरज सुरेंद्रप्रसाद जयस्वाल यांचे घर आहे. जयस्वाल कुटुंब साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी शुक्रवारी ( ता. २४ ) घराला कुलूप लावून यवतमाळ येथे गेले होते. घराला कुलूप असल्याचा गैरफायदा घेत चोरट्यांनी घराच्या पाठीमागे जाऊन दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील साहित्याची नासधूस केली. तसेच कपाटाचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटात ठेवलेले अडीच लाख रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने व पन्नास हजार व रोख रक्कम असा तीन लाख रुपयांचा ऐवज पळवला जयस्वाल कुटुंब शनिवारी ( ता. 25) सायंकाळी वसमत येथे परत आले.

घरात प्रवेश करताच घरातील साहित्य अस्ताव्यस्त पाहून घरात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने वसमत शहर पोलिसांना घटनेची माहिती दिली. शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक रवींद्रसिंग धुन्ने, उपनिरीक्षक मराडे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणी जयस्वाल यांच्या तक्रारीवरून वसमत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. उपनिरीक्षक श्री. मराडे पुढील तपास करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: thief in Vasmat