सावधान! बंद घरांवर चोरांची नजर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 एप्रिल 2018

लातूर - तुम्ही घर बंद करून बाहेर पडणार असाल तर थोडे सावध राहा. घरात काही मौल्यवान वस्तू तर नाहीत ना, याची एकदा खात्री करून घ्या. कारण बंद घरांवर चोर लक्ष ठेवून असल्याचे शहर आणि जिल्ह्यात घडणाऱ्या घरफोडींवरून स्पष्ट होत आहे.

लातूर - तुम्ही घर बंद करून बाहेर पडणार असाल तर थोडे सावध राहा. घरात काही मौल्यवान वस्तू तर नाहीत ना, याची एकदा खात्री करून घ्या. कारण बंद घरांवर चोर लक्ष ठेवून असल्याचे शहर आणि जिल्ह्यात घडणाऱ्या घरफोडींवरून स्पष्ट होत आहे.

घर बंद असले की अवघ्या काही मिनिटांमध्ये चोरटे घराचे कुलूप तोडून मौल्यवान वस्तू पळवत आहेत. अशा घटना मागील आठवड्यात लागोपाठ शहरात आणि जिल्ह्यात घडल्याचे समोर आले आहे. बंद घरात असलेले सोने, चांदी, रोख रक्कम याच वस्तू चोर पळवत आहेत. घराबरोबरच दुकान, पानटपरी, शाळा येथेही चोरीच्या घटना वाढत आहेत. सातत्याने घडणाऱ्या या घटनांमुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या, असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.

याकडे लक्ष द्या 
घर, सोसायटीच्या आवारात सीसीटीव्ही लावा
बाहेर जाताना विश्वासू शेजाऱ्यांना कल्पना द्या
घरात मौल्यवान वस्तू ठेवणे टाळा 
वॉचमन ओळखीतला, खात्रीशीर असावा
वॉचमनचा बायोडाटा किंवा ओळखपत्र घरात ठेवा
घरांत मौल्यवान वस्तू आहेत, हे इतरांना कळू देऊ नका
घराच्या मुख्य दाराला सेफ्टी डोअर बसवा

काही घटना
निलंगा येथे डॉक्‍टरचे घर फोडून सात तोळे सोने आणि सत्तर हजार लंपास.
लातुरात रेणापूर नाका भागात असलेल्या एका घरातील चार लाख १० हजार रुपयांचे सोने आणि इतर ५५ हजारांचा माल चोरीला.
लातुरातील दुकानदाराचे घर फोडून सोन्या-चांदीसह ५२ हजारांचा माल लंपास .
तुपडी भागात घराची खिडकी तोडून ५० हजार रोख आणि सहा तोळे सोने पळविले.
औराद शहाजनी भागातील दुकान फोडून ६५ हजार रुपये चोरले.

Web Title: Thieves are keeping watch on closed homes