औसा-तुळजापूर महामार्गावर चोरट्यांचा धुमाकुळ, वाहनचालकांना चाकूने जखमी करून लुटले

गौस शेख
Wednesday, 2 December 2020

मध्य प्रदेशहून कर्नाटक येथे गहू घेऊन जाणाऱ्‍या ट्रकवर अज्ञात चोरट्यांनी दगडफेक करीत ट्रकमधील चालक व अन्य एकाला दगडाने मारहाण करित गळ्याला चाकू लावून रोख अकरा हजार रुपये व तेरा हजारांचा मोबाईल चोरून नेल्याची घटना औसा-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील बेलकुंड (ता.औसा) येथे बुधवारी (ता.दोन) पहाटे पाच वाजेच्या सुमारास घडली आहे.

बेलकुंड (जि.लातूर) : मध्य प्रदेशहून कर्नाटक येथे गहू घेऊन जाणाऱ्‍या ट्रकवर अज्ञात चोरट्यांनी दगडफेक करीत ट्रकमधील चालक व अन्य एकाला दगडाने मारहाण करित गळ्याला चाकू लावून रोख अकरा हजार रुपये व तेरा हजारांचा मोबाईल चोरून नेल्याची घटना औसा-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील बेलकुंड (ता.औसा) येथे बुधवारी (ता.दोन) पहाटे पाच वाजेच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी भादा येथील पोलिस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.

मोहगाव काछी, सिवनी मध्य प्रदेश राज्यातील फरीद शाह (वय ३६) व मकसुद छोटेमियाँ खान (वय ३०)  हे दोघे मध्य प्रदेश येथील जबलपूरहून गहू घेऊन कर्नाटक येथे जात असताना त्यांची ट्रक (एमएच ४० बीजी ९७५७) ही औसा-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील बेलकुंड येथे मंगळवारी (ता.एक) सायंकाळी सहाच्या सुमारास बंद पडली. ट्रक सुरू होत नसल्याने पाहून दोघेही ट्रकमध्ये झोपी गेले असता बुधवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास अज्ञात चार ते पाच चोरट्यांनी ट्रकवर दगडफेक करीत गाडीत प्रवेश केला व ट्रकमधील फरीद, मकसुद या दोघांना दगडाने मारहाण करित गळ्याला चाकू लाऊन यांच्याकडील तेरा हजारांचा मोबाईल व रोख रूपये अकरा हजार रुपये घेऊन लंपास केले. या घटनेत दोघांनाही अज्ञात चोरट्यांनी जखमी केले आहेत. वांगजी पाटी ते आशिव दरम्यान तीन वाहनावर अज्ञात चोरट्यांनी दगडफेक करीत त्यांना लुटल्याची घटना ताजी असतानाच बुधवारी दुसरी घटना घडल्याने वाहनचालकांत भितीचे वातावरण पसरले आहे.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thieves Looted Drivers In Belkund Latur News