
याबाबत मोहन चवन हीप्परगे यांनी निलंगा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोराविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निलंगा (लातूर): अज्ञात चोरट्याने शुक्रवारी (ता. 5) रोजी दुपारी एका निवृत्त शिक्षकाच्या मोटारसायकलची डिक्की फोडून दोन लाख लंपास केले. यामुळे शहरात एकच खळबळ उडाली असून निलंगा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील बुलढाणा अर्बन बँंकेसमोर सेवानिवृत शिक्षक मोहन चवन हिप्परगे र(तळीखेड) यांची मोटारसायकल क्रमांक एम.एच.२४ ए.एम.७०४८ उभी केली होती. भरदुपारी 12.30 वाजता चोरट्याने लक्ष ठेवून डिक्की फोडून त्यातील दोन लाख रूपये लंपास केले. याबाबत मोहन चवन हीप्परगे यांनी निलंगा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोराविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कळंबच्या गटविकास अधिकाऱ्याविरुद्ध अविश्वास ठराव मासिक सभेत मंजूर
एक लाख वाचले-
या सेवानिवृत्त शिक्षकाने शेतीकामासाठी एकूण तीन लाख बँकेतून काढले होते. त्यातील एक लाख रूपये जवळ ठेवले होते आणि दोन लाख रूपये मोटारसायकलच्या डिक्कीत. एक लाख रूपये जवळ खिशामध्ये ठेवल्यामुळे निदान ते तर पैसे वाचले आहेत.
गंगाखेडातील व्यापाऱ्यास लुटणाऱ्या तिघांना पकडले, एक पिस्टल जप्त
मागील 10 दिवसांतील चोरीची ही तिसरी घटना आहे. अमरावतीवरून उधारी वसूलीसाठी आलेले कपड्याच्या व्यापाऱ्याची कारमधून दिवसा ढवळ्या पळविली होती. तर शहरातीलच एका पीग्मी एज्टंला लूटल्याची घटनाही ताजी होती. अशातच एका सेवानिवृत शिक्षकाच्या मोटारसायकलची डिक्की फोडून २ लाख रूपये लंपास केल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. शहरात चोरींचे प्रमाण वाढल्याचे दिसत असतानाही निलंग्याचे पोलिस मात्र हतबल झाल्याचे दिसत आहेत. तीन चोरीच्या घटना घडल्या असून सीसीटीव्ही कॅमे-यात चोरी करणारे कैद होऊनही सुगावा लागत नाहीये यामुळे संशय व्यक्त केला जात आहे.
(edited by- pramod sarawale)