येरमाळा - राष्ट्रीय महामार्ग सोलापूर-धुळे रस्त्यावरील वाहन लुटीचे प्रकार काय थांबण्याचे नाव घेत नसल्याने महिनाभर थांबलेले वाहन लुटीचे प्रकार सुरु करुन चोरट्यांनी एक प्रकारे स्थानिक पोलीस प्रशासनासह नव्याने रुजू झालेल्या पोलीस अधीक्षक रितू खोखर यांना आव्हान दिले आहे.