राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी यांच्या काही गोष्टी गुप्त असतात त्या कळत नसतात, अमित देशमुखांची गुगली

3amit_20deshmukh_0
3amit_20deshmukh_0

निलंगा (जि.लातूर) : राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून राज्यपाल व सरकार याचा संघर्ष ही बाब अनेक वेळा समोर आलेली आहे. अशा मध्येच मागील आठवड्यात वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांचे राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी यांनी अमित देशमुख यांच्या कामाचे कौतुक करून तुम आगे बढो असा सल्ला दिला होता. याबाबत निलंगा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत अमित देशमुख यांना आपले व राज्यपालाचे काय गुपित आहे. त्यांनी आपली स्तुती केली असे विचारले असता ते म्हणाले की, राज्यपालांच्या काही गोष्टी गुप्त त्या कळत नसतात असे उत्तर देऊन एक प्रकारे वेगळी गुगली टाकली.


निलंगा येथे पालकमंत्री तथा राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी मंगळवारी (ता.दहा) येथील पंचायत समितीच्या सभागृहात कोरोना संसर्ग आढावा व पूरग्रस्त निधीबाबत आढावा बैठक घेतली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी जिल्ह्यातील विविध विषयावर माहिती दिली. लातूर जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीत शेतकऱ्यांना शासनाने निधीची तरतूद केली असून अतिवृष्टीग्रस्त एकही शेतकरी वंचित राहणार आहे. याबाबत आदेश देण्यात आले आहेत. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या आहेत. पिकाचे नुकसान झाले आहे. त्यांना तात्काळ मदत मिळणार आहे. शिवाय कोरोना संसर्गासाठी ग्रामीण भागातील नागरिकापर्यंत दुसरी लाट येण्याच्या संदर्भात ज्या भागांमध्ये दुसरी लाट सुरू आहे.

त्या भागातील परिस्थितीचा अभ्यास करून महाराष्ट्रात संभाव्य सावधानता म्हणून काळजी घेण्यासाठी आरोग्य विभागाने सतर्क राहण्याची गरज आहे. पूर्णा संसर्ग मंदावला असून लातूर जिल्ह्यामध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण अतिशय कमी झाले आहेत. निलंगा तालुक्यामध्ये तर गेल्या तीन दिवसांपासून एकही रुग्ण नाही, अशी माहिती देऊन जिल्ह्यातील अनेक सेंटर रुग्ण नसल्यामुळे बंद करण्यात आले आहेत. कोरोना संसर्ग काळात ज्या कोरोना योद्ध्यांनी काम केले त्यांचे अभिनंदन व आभार करण्याची आवश्यकता आहे. हेच आपले व्यक्ती असून नरसी पर्यंत सर्वांनी काळजी घेण्याची गरज असल्याचे श्री.देशमुख यांनी यावेळी सांगितले.

पत्रकार परिषदेमध्ये राज्यपाल व सरकार यांच्यामध्ये होत असलेल्या संघर्ष अधून-मधून होत असून अशा स्थितीत महाविकास आघाडी सरकारमधील एक तरुण मंत्री अमित देशमुख यांची राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी यांनी मागील आठवड्यात वैद्यकीय विभागाच्या कार्यक्रमात जाहीर स्तुती केली होती. त्या अनुषंगाने विचारला असता पालकमंत्री अमित देशमुख म्हणाले की राज्यपालांच्या काही गोष्टी गुप्ता असतात. त्या कळत नाहीत अशी गुगली टाकून त्यांनी राज्यपाल व अमित देशमुख यांच्या संबंधाबद्दलची राज्यात उत्सुकता वाढवली आहे.

सतीश चव्हा पुन्हा निवडून येतील
सध्या पदवीधर मतदारसंघाची निवडणूक सुरू असून या मतदारसंघातून औरंगाबाद विभागातून महाविकास आघाडीच्या वतीने सतीश चव्हाण यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. याबाबत पालकमंत्री अमित देशमुख म्हणाले, की सतीश चव्हाण यांचे काम अतिशय चांगले आहे.विधिमंडळामध्ये त्यांनी मराठवाड्याच्या विविध प्रश्नासाठी आती आवाज उठवला असून या मतदारसंघातून पुनश्च त्यांनाच महाविकास आघाडीच्या वतीने उमेदवारी देण्यात आली आहे. ते प्रचंड पुन्हा एकदा निवडून येतील असा विश्वास पालकमंत्री अमित देशमुख यांनी व्यक्त केला. यावेळी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर, काँग्रेस जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे, काँग्रेसचे युवा नेते अभय साळुंके, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष श्री सिरसाठ, तालुकाध्यक्ष विजय कुमार पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com