धक्कादायक : जालन्यात कोरोनाचा तिसरा बळी 

महेश गायकवाड
Thursday, 4 June 2020

जालना शहरातील लक्ष्मीनारायणपुरा भागातील ६० वर्षीय महिला मंगळवारी जिल्हा सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाली होती. तिचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला होता. ही महिला मधुमेह, रक्तदाब व हृदयाच्या आजाराने ग्रस्त होती. त्यामुळे तिची प्रकृती गंभीर होती. उपचार सुरू असताना गुरुवारी दुपारी या महिलेचा मृत्यू झाला.

जालना - शहरातील लक्ष्मीनारायणपुरा येथील कोरोना बाधित साठ वर्षीय महिलेचा गुरुवारी( ता.चार) साडे बारा वाजेच्या दरम्यान मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.मधुकर राठोड यांनी दिली आहे. या मृत्यूमुळे जिल्ह्यात कोरोनाच्या तिसऱ्या बळीची नोंद झाली आहे. 

कोरोनामुळे जिल्ह्यात आतापर्यंत दोन बळी गेले असतांनाच गुरुवारी जालना शहरातील लक्ष्मीनारायणपुरा भागातील ६० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.

हेही वाचा : अख्खा जेसीबीच विहिरीत गुडूप

यापूर्वी परतूर तालुक्यातील मापेगाव येथील एका ४५ वर्षीय व्यक्तीसह जालना शहरातील मोदीखाना भागातील ८० वर्षीय वृध्द व्यक्तीचा कोरोना मुळे मृत्यू झाला होता.

हेही वाचा : पीककर्जावर शेतकऱ्यांची मदार

जालना शहरातील लक्ष्मीनारायणपुरा भागातील ६० वर्षीय महिला मंगळवारी जिल्हा सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाली होती. तिचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला होता. ही महिला मधुमेह, रक्तदाब व हृदयाच्या आजाराने ग्रस्त होती. त्यामुळे तिची प्रकृती गंभीर होती. उपचार सुरू असताना गुरुवारी दुपारी या महिलेचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राठोड यांनी दिली आहे.

मंठा तालुक्यात आढळले अकरा कोरोनाबाधित

जालना जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये गुरूवारी (ता.चार) अकरा रुग्णांची भर पडली असून हे सर्व रूग्ण मंठा तालुक्यातील एकाच कुटुंबात आढळून आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या १७० झाली असून त्यांपैकी तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर ५८ रूग्ण बरे होऊन घरी परतले आहे. कोरोना बाधित व्यक्तींच्या  संपर्कात आल्याने मंठा तालुक्यातील अकरा अकरा संशयितांचे अहवाल  बुधवारी रात्री उशिरा कोरोना पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राठोड यांनी दिली आहे.  या अकरा रुग्णांमध्ये नानशी येथील ८, केंधळी येथील २ आणि वैद्य वडगाव येथील  एका व्यक्तीचा समावेश आहे. मंठा तालुक्यातील नानशी येथे यापूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. या रुग्णाच्या संपर्कात आल्यामुळे  या अकरा रुग्णांना कोरोनाची बाधा झाल्याची  माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली आहे.  वाढलेल्या नवीन  रुग्णांमुळे जिल्ह्यातील  बाधितांची संख्या  आता १७० वर पोचली असून त्यांपैकी आतापर्यंत ५८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Third corona patient died in Jalna