औशात तिसऱ्या आघाडीची जोरदार तयारी, पालिका निवडणुकीत येणार दोन दिग्गज एकत्र?

Mitkari Utage Shaikh1
Mitkari Utage Shaikh1

औसा (जि.लातूर) : औसा नगरपरिषदेची निवडणूक अजुन एक वर्ष दूर असली तरी औशात सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेसला शह देण्यासाठी शहरात पालिकेचे दोन माजी नगराध्यक्ष तिसऱ्या आघाडीची स्थापना करुन सत्तेची समीकरणे जुळवित आहेत. गत निवडणुकीत एकमेकांविरोधात लढलेले हे दोन दिग्गज एकत्र आल्यास औसा पालिकेचे सत्तेचे समीकरण नक्की बदलणार असल्याची चर्चा शहरात जोरदार सुरु आहे. या दोन नेत्यांच्या गुप्त आणि उघड बैठकाही झाल्या असुन त्यांची वार्डनिहाय चाचपणीही सुरु असल्याचे कळते. सध्या राज्यात महाविकास अघाडीचे सरकार असुन महाविकास अघाडीचा फॉर्म्युला यशस्वी ठरत असल्याने जर पालिका निवडणुकीतही तो अंमलात आणला तर पक्षाच्या झेंड्याखाली न उभे राहता स्वतंत्र शहर विकास आघाडी तयार करुन सत्ताकाबीज करण्याचा खटाटोप चालल्याने आणि आता नगराध्यक्ष नगरसेवकांमधून निवडायचा असल्याने सत्ताधारी राष्ट्रवादीला येणारी निवडणूक सोपी जाणार नाही असेच दिसून येते.

औशाच्या राजकारणात पंधरा वर्षांपासून तीन नव्या चेहऱ्यावर नगरपालिका निवडणुकीची मदार राजकीय पक्षातून पाहायला मिळते. यात कॉंग्रेसचे सुनिल मिटकरी, भाजपचे किरण उटगे, राष्ट्रवादीचे डॉ.अफसर शेख ही नावे नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत कायम आहेत. विशेष म्हणजे या तिघांनाही नगरपालिकेत नगराध्यक्ष होण्याचा बहुमान मिळाला. चार वर्षांपूर्वी झालेल्या नगरपालिका निवडणुकीत हे तिन चेहरे एकमेकांसमोर उभे राहतील आणि जोरदार लढत होणार असे मानले जात होते. तसे घडलेही राष्ट्रवादीकडून अफसर शेख यांनी तर भाजपकडून किरण उटगे हे मैदानात उतरले. मात्र कॉंग्रेसकडून ऐनवेळी सुनिल मिटकरी यांना उमेदवारी नाकारल्याने त्यांनी अपक्ष निवडणूक लढविली. त्यातच सेनेनेही भाजपला सोडून वेगळी चुल मांडत कधी नव्हे पहिल्यांदा नगराध्यक्षपदासाठी उमेदवार दिला. निवडणुकीत कॉंग्रेसकडून झालेली चुक राष्ट्रवादीच्या पथ्यावर पडल्याचे दिसुन आले.

याचे कारण असे की त्यांच्याकडून देण्यात आलेला उमेदवार व काही प्रभागात नगरसेवकपदासाठी कच्चे उमेदवार दिल्याने याचा फटका कॉंग्रेसला बसला. निवडणूक प्रचारात अपक्ष उमेदवार सुनिल मिटकरी यांनी अघाडी घेत राष्ट्रवादीपेक्षा भाजपलाच जास्त आव्हान दिल्याने यात मतांची विभागणी झाली.त्याचा पुरेपुर फायदा निकालानंतर पडलेल्या सर्व उमेदवारांच्या मतांवरुन दिसुन आले. या सगळ्या बाबींचा विचार करीत व मतांची विभागणी टाळण्यासाठी शहरात सुप्त चर्चा सुरु झाली की, उटगे व मिटकरी यांनी एकत्र येऊन येणारी निवडणूक लढवावी. कारण ही निवडणूक आता जनतेतून नगराध्यक्ष नव्हे तर नगरसेवकांमधून निवड होत आहे. शहरातील सर्वच प्रभागात मिटकरी व उटगे यांचे प्राबल्य व त्यांना मानणारा वर्ग आहे. वॉर्डनिहाय उमेदवार निवडतांना निवडुन येणाऱ्या व्यक्तीला उमेदवारी देण्याची त्यांची दुरदृष्टी फलदायी ठरणार असल्याने आता हे दोघेही एकत्र येऊ थेट मतदारांमध्ये जाऊन चाचपणी करीत आहेत. त्यातुन त्यांच्या या आघाडीला निवडणुकीच्या अगोदरच लोकांतून चांगले समर्थन मिळत असल्याने राष्ट्रवादीला याची किंमत मोजावी लागणार आहे.


आमदार साहेब तुम्ही कोणाचे?
आगामी पालिकेच्या निवडणुकीत जगजाहीरपणे माजी नगराध्यक्ष सुनिल मिटकरी, जयश्री उटगे, बंडू कोद्रे यांच्यासह अनेक नावे आहेत. ज्यांनी आमदारांसाठी काम केले. तेच लोक या आघाडीच्या मोठ बांधणीत आपली भुमिका निभावत आहेत. अशा परिस्थितीत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आमदारांचे लक्ष असावे का? शंभर टक्के असावे पण ही निवडणूक कार्यकर्त्यांची असल्याने ज्यांनी-ज्यांनी आपल्याला मदत केली त्यांना आगामी निवडणुकीत बळ देण्याचे काम आमदारांनी केले पाहिजे म्हणुन आता आमदार अभिमन्यु पवारांनीही दुसऱ्या पक्षाचा असला तरी आघाडीचा घटक आहे. त्यांना मदत करण्यास मागे राहू नये असा सूर आता उमटत आहे.
 

संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com