उस्मानाबादला दिलासा, ३१ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह

तानाजी जाधवर
गुरुवार, 21 मे 2020

जिल्ह्यातील ३१ लोकांचे अहवाल आज निगेटिव्ह आले आहेत. मंगळवारी एकाच दिवशी जिल्ह्यात सहा जणाना कोरोनाची लागन झाली होती. तेव्हा काही लोकांचे स्वॅब घेतले होते. त्यातील ३१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने जिल्ह्याला तुर्तास तरी दिलासा मिळाला आहे. अजुनही चार लोकांचे अहवाल येणे बाकी आहे.

उस्मानाबाद : जिल्ह्यातील ३१ रुग्णांचे अहवाल आज निगेटिव्ह आले आहेत. मंगळवारी एकाच दिवशी जिल्ह्यात सहा जणाना कोरोनाची लागन झाली होती. तेव्हा काही लोकांचे स्वॅब घेतले होते. त्यातील ३१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने जिल्ह्याला तुर्तास तरी दिलासा मिळाला आहे. अजुनही चार लोकांचे अहवाल येणे बाकी आहे.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

जिल्हा रुग्णालयातून आजतागायत एकूण ९४१ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी उस्मानाबाद तालुक्यातील १९० , तुळजापूर १८६, उमरगा २१८, लोहारा ६८, कळंब १६६, वाशी ११, भूम ३६, परंडा ६६ अशा व्यक्तींच्या  स्वॅबची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी ८०७ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून ३१ व्यक्तीचे अहवाल वगळण्यात आले आहेत. तसेच ८८ व्यक्तींचे अहवाल हे आणखी प्राप्त  झालेले नाहीत.

आजपर्यंत एकूण १६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण उस्मानाबाद जिल्ह्यात आढळुन आले आहेत त्यापैती ४ रुग्णांची प्रकृती चांगली असल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. (उमरगा ३ व परंडा १) सदयस्थितीमध्ये एकूण १२ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असून ते वेगवेगळया रुग्णालयात उपचार घेत आहेत.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

कळंब येथील एका रुग्णाची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना वैदयकिय महाविदयाल सोलापुर येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. तसेच उपजिल्हा रुग्णालय तुळजापुर येथे २, उपजिल्हा रुग्णालय परंडा ४, उपजिल्हा रुग्णालय कळंब ४ व जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद येथे एक असे एकूण १२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत.

सध्या त्यांची प्रकृती चांगली  आहे. गेल्या काही दिवसापासूनच जिल्ह्यात कोरोनाने शिरकाव केला असून सध्या जिल्ह्यात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोविड पॉझिटिव्ह रुग्ण हायरिस्क भागातून आल्याचे समोर आले आहे.

त्यामुळे जिल्ह्यावरील धोका वाढत असल्याचे चित्र आहे. पंधरा ते वीस दिवसामध्ये फक्त ग्रामीण भागात जवळपास २० हजार लोकांची, बाहेरुन जिल्ह्यात आल्याची नोंद आहे. सध्यातरी जिल्ह्यातील उस्मानाबाद व तुळजापूर नगरपालिका क्षेत्रात अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंद ठेवण्यात आले आहेत.

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thirty One CoronaVirus Negative Patient Osamanabad News