esakal | उस्मानाबाद जिल्ह्यात तब्बल ३५ हजार जणांना दुर्धर आजार, तुळजापूर तालुक्यात रुग्णांची सर्वाधिक संख्या
sakal

बोलून बातमी शोधा

Disease

उस्मानाबाद  जिल्ह्यात सुमारे ३५ हजार दुर्धर आजाराचे रुग्ण असून, तुळजापूर तालुक्यात सर्वाधिक रुग्णांची संख्या आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात तब्बल ३५ हजार जणांना दुर्धर आजार, तुळजापूर तालुक्यात रुग्णांची सर्वाधिक संख्या

sakal_logo
By
सयाजी शेळके

उस्मानाबाद : जिल्ह्यात सुमारे ३५ हजार दुर्धर आजाराचे रुग्ण असून, तुळजापूर तालुक्यात सर्वाधिक रुग्णांची संख्या आहे. दरम्यान दुसऱ्या टप्प्यातील कोरोनाचा संसर्ग आणि मृत्यूदर कमी करण्यासाठी अशा आजारावरील रुग्णांची काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.जिल्ह्यात दुर्धर आजाराने ग्रासलेल्या रुग्णांची संख्या तब्बल ३५ हजारापर्यंत गेली आहे. यामध्ये सर्वाधिक रुग्ण तुळजापूर तालुक्यात आहेत. भूम आणि लोहारा तालुक्यात अशा रुग्णांची संख्या सर्वांत कमी आहे. तुळजापूर तालुक्यात सात हजार १४१, कळंब सहा हजार ४८२, उमरगा सहा हजार १३९, उस्मानाबाद पाच हजार ९८०, परंडा चार हजार २१८, भूम तीन हजार ४९७ तर लोहारा तालुक्यात दोन हजार ३७० रुग्णांची संख्या आहे.


मधुमेह, हायपरटेन्शनचे रुग्ण अधिक
जिल्ह्यात मधुमेह असणाऱ्यांची संख्या मोठी आहे. अशा रुग्णांना हायपरटेन्शनचा त्रास आहे असे काही रुग्ण आहेत. हे दोन्ही आजार असणाऱ्यांची संख्या ९.३ टक्के आहे. हृदयविकार असणाऱ्यांची संख्या ८.७ टक्के, अस्थमा ६.५, मधुमेह व हृदयविकार १.९ तर कर्करोग असणाऱ्यांची संख्या एक टक्के आहे. याशिवाय इतर दुर्धर आजार असलेल्यांची १७.१ टक्के आहे.

काळजी घेण्याचे आवाहन
दुसऱ्या टप्प्यात कोरोनाचा शिरकाव वाढत असल्याचे दिसत आहे. सध्या थंडीही वाढत आहे. अशा स्थितीत जिल्ह्यातही खबरदारी घेतली जात आहे. नागरिकांनी सर्व नियम पाळण्याचे आवाहन केले जात आहे. यापूर्वीही जिल्ह्यात मृत्यूदर जास्तीचा आहे. त्यात पुन्हा दुसरी लाट येत असल्याचे संकेत मिळत असल्याने दुर्धर आजार असलेल्या नागरिकांची काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे.
 

Edited - Ganesh Pitekar