हातावर पोट असणाऱ्यांची होतेय आबाळ

कृष्णा जोमेगावकर
Saturday, 11 April 2020

शहरात अनेक कुटूंब हातगाडे, सायकल रिक्षा, ॲटोरिक्षा, हमाल, फळे व भाजीपाला विक्रेते, मापाडी, वेगवेगळे कारागीर, घरकामगार, रंगकामगार, केस कर्तनालय, चांभार, पंक्चर काढणारे आदींचा समावेश आहे.

नांदेड : कोरोना विषाणूचा प्रतिबंध करण्यासाठी शासनाने लागू केलेल्या एक दिवसाच्या लॉगडाऊनमुळे हातावर पोट असणारे मोठ्या अडचणीत आले आहेत. शहरात अनेक कुटूंब हातगाडे, सायकल रिक्षा, ॲटोरिक्षा, हमाल, फळे व भाजीपाला विक्रेते, मापाडी, वेगवेगळे कारागीर, घरकामगार यांचा समावेश आहे. सध्या उन्हाळा असल्यामुळे कुलर बाजारातील  सायकल रिक्षा चालकांचा व्यवसाय बुडाल्याने रिक्षा रस्त्याला लावून उपाशीपोटी झोपावे लागत असल्याचे चित्र शुक्रवारी (ता. १०) महादेव दालमिल परिसरात पाहायला मिळाले. 

हातावर पोट असणारे सर्वाधीक अडचणीत
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरु झाल्यामुळे त्याचा धोका अधीक लोकांना बसू नये यासाठी सर्वात महत्वाची खबरदारी म्हणजे लोकांचा संपर्क टाळणे हा आहे. यामुळे शासनाने प्रथम ता. २२ मार्च रोजी जनता कर्फ्यु लावण्यात आला. यानंतर शासनाने लगेच २१ दिवसाचा लॉगडाऊन घोषीत करुन संपुर्ण व्यवहार बंद केला. रस्त्यावर कोणीचे दिसणार नाही, याची खबरदारी प्रशासनाने घेतली. यामुळे सर्व अस्थापणा बंद झाल्या. परिणामी जे रोज कमाइ करुन उपजिविका भागवित होते, अशांना सर्वाधीक फटका बसला. शासन, प्रशासनाकडून गरजू लोकांना जीवणावश्यक वस्तु घरपोच देण्याचे काम हाती घेतले. तसेच सार्वजनिक वितरण व्यवस्थेतंर्गत धान्यही पुरविण्याचे काम सुरु आहे.

हेही वाचा....अत्यावश्यक कामासाठी सुधारीत आदेश

हजारो कुटूंबाचा रोजगार बुडाला
शहरात अनेक कुटूंब हातगाडे, सायकल रिक्षा, ॲटोरिक्षा, हमाल, फळे व भाजीपाला विक्रेते, मापाडी, वेगवेगळे कारागीर, घरकामगार, रंगकामगार, केस कर्तनालय, चांभार, पंक्चर काढणारे आदींचा समावेश आहे. या कामगारांना रोज काम करुन आपली उपजिविका भागवावी लागते. या व्यवसायाच्या भरवश्यावर अनेकांनी बॅंक, फायनान्स, पतसंस्था आदीकडून कर्ज काढले आहे. त्याचे हप्ते काम करुन भरावे लागते. परंतु सध्या कामच बंद असल्याचे कर्जाचे हप्तेही थांबले आहेत. कर्ज हप्त्यांची वसुली सरकारने थांबविली असलीतरी त्याचे व्याज व हप्त्याचा बोजा मात्र माथी बसणार आहे.  

हेही वाचलेच पाहिजे.... ज्योतिषी म्हणतात, या तारखेला होईल भारत कोरोनामुक्त...
 
कुलर बाजारात शुकशुकाट
लाॕकडाऊनमध्ये हातावर पोट असणाऱ्यांना काम आभावी पोटाला चिमटा बसत आहे. नांदेड शहरातील दयानंदनगर जवळ महादेव दालमिलजवळ असलेले कुलर मार्केट बंद आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे या भागात वाहनांची तसेच रिक्षावाल्यांची मोठी वर्दळ असते. या ठिकाणी शहरात सर्वाधिक कुलर बनविणारे कारागीर आहेत. दररोज हजारो कुलर या ठिकाणाहून शहरात तसेच बाहेरगावी जातात. सध्या एप्रिल महिन्याचा महिला पंधरवडा सुरू असल्यामुळे उन्हाळा ही वाढला आहे. परंतु कोरोना विषाणुच्या प्रतिबंधासाठी शासनाचा लाॕकडाऊन सुरू असल्यामुळे सर्वच व्यवहार ठप्प झाले आहेत. या कुलर शॉप समोर हात रिक्षेवाला काम नसल्यामुळे शुक्रवारी दुपारी रिक्षा उभा करून त्यावर झोपलेला आढळला. लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका हातावर पोट असणाऱ्यांना बसल्याचे हे ताजे उदाहरण म्हणता येईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Those with stomachs on hand were irritated, nanded news