esakal | ज्योतिषी म्हणतात, या तारखेला होईल भारत कोरोनामुक्त...
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad News

कोणत्याही आपत्ती माणसाच्या हाताळण्यापलिकडे गेल्या, की तो दैवाचा हवाला घेतो. संकटांचे निराकरण करण्याचे आपले प्रयत्न थकले, की ज्योतिषशास्त्राबद्दल आपली उत्सुकता चाळवू लागते. 

ज्योतिषी म्हणतात, या तारखेला होईल भारत कोरोनामुक्त...

sakal_logo
By
टीम ई सकाळ

जगभर थैमान घालत असलेल्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाबद्दल सगळीकडेच भीतीचे वातावरण आहे. आतापर्यंत युरोप, आशिया आणि अमेरिकेतही मिळून हजारो बळी घेणाऱ्या या विषाणूच्या संकटाबद्दल ज्योतिषशास्त्र काय सांगते? वेदमूर्ती, ज्योतिषाचार्य, वास्तुतज्ज्ञ अनंत पांडव यांनी याबद्दल नेंदवलेली निरीक्षणे eSakal.com च्या वाचकांसाठी खास... 

धनु राशीत गुरु आणि केतू एकाचवेळी विराजमान झाले आहेत. त्यामुळे चीनच्या वुहान शहरापुरता मर्यादित असलेला कोरोना व्हायरस जोमाने पसरू लागला. ७ फेब्रुवारी रोजी मंगळ ग्रहाच्या धनू राशीतील प्रवेशामुळे कोरोना हा महारोग बनला आणि संपूर्ण जगात पसरला, असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. 

संताप येईल तुम्हाला ही बातमी वाचाल तर...

गेला महिनाभर संपूर्ण जगाला चिंताग्रस्त करणाऱ्या कोरोनाचा प्रभाव आगामी १५ दिवसात कमी होईल, हे सांगतानाच त्याची शास्त्रीय कारणेही अनंत पांडव यांनी दिली आहेत. ते म्हणतात, २२ मार्च रोजी धनू राशीतून मंगळ ग्रहाने मकर राशीत प्रवेश केला आहे. त्यामुळे केतु ग्रहाशी असलेली युती संपुष्टात येणार आहे

यानंतर ३० मार्च रोजी गुरु ग्रहानेही केतू ग्रहाची युती सोडून मकर राशीत प्रवेश केला आहे. दोन्ही मोठ्या ग्रहांनी मकर राशीत प्रवेश केल्याने विषाणूचा प्रभाव मोठ्या प्रमाणात ओसरेल, तसेच स्वतंत्र भारताचा संबंध मकर राशीशी असल्यामुळे दोन्ही ग्रहांचा मकर राशीतील प्रवेश आपल्या देशासाठी लाभकारक मानला गेला आहे.

ज्योतिषशास्त्र सांगते, त्याप्रमाणे जर घडत गेले, तर भारतासाठी मोठ्या प्रमाणात दिलासा देणारी ही घटना ठरेल. २६ एप्रिल रोजी भारत कोरोनामुक्त असेल, असेही भाकित ज्योतिषाचार्यांनी वर्तवले आहे.