esakal | Video: गांभीर्य नसणाऱ्यांना मिळाला काठीचा प्रसाद
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

‘कोरोना’चे गांभीर्य न घेणाऱ्यांना मंगळवारी (ता.२४) चांगलाच प्रसाद मिळाला. कितीही सांगुनही लोक ऐकत नसल्याने स्वत:जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक यांना  रस्त्यावर उतरावे लागले.

Video: गांभीर्य नसणाऱ्यांना मिळाला काठीचा प्रसाद

sakal_logo
By
कैलास चव्हाण

परभणी : ‘कोरोना’ विषाणुला प्रतिबंधात्मक उपाय म्हणून संचारबंदी लावल्यानंतरही रस्त्यावर आलेल्या लोकांना अखेर पोलिस आणि महसुल प्रशासनाने दंडुका घेत चांगलाच चोप दिला. ‘कोरोना’चे गांभीर्य न घेणाऱ्यांना मंगळवारी (ता.२४) चांगलाच प्रसाद मिळाला. कितीही सांगुनही लोक ऐकत नसल्याने स्वत:जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक यांना  रस्त्यावर उतरावे लागले. त्यामुळे सकाळी ११ नंतर अवघ्या शहरात सन्नाटा पसरला.

हेही वाचा - परभणी जिल्ह्यात एकही कोरोना बाधित रुग्ण नाही
‘कोराना’मुळे अवघे जग संकटात सापडले आहे. त्यासाठी गर्दी कमी करण्याचे आवाहन केले जात आहे. सर्वत्र लॉकडाऊन करण्यात येऊनही लोक गर्दी कमी करण्याचे थांबवत नसल्याने सोमवारी राज्य शासनाने सर्वत्र संचारबंदी लागु केली आहे. तरीही काही महाभाग मंगळवारी रस्त्यावर दिसुन आले. बहुतांष शासकीय कार्यालय बंद आहेत. खासगी अस्थापना पूर्णत: बंद असतानाही लोक बाहेर पडत असल्याने मंगळवारी प्रशासनाला कडक भुमीका घ्यावी लागली. काही भागात लोक रस्त्यावर येत आहेत. तर काही वाहने घेऊन बाहेर पडली आहेत. त्यामुळे सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर, पोलिस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जाऊन लोकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले. तसेच उपस्थित अधिकाऱ्यांना सुचना केली. त्यानंतर पोलिसांनी कडक भुमीका घेत रस्त्यावर आलेल्यांना झोडपून काढण्यास सुरुवात केली.

हेही वाचा व पहा - Video : परभणी महापालिकेतर्फे शहर निर्जंतूकीकरणाचे काम सुरु
 
भाजीपाला विक्री बंद
वाहनधारकाना थांबवुन त्यांची विचारपूस करत परत पाठवण्यात येत आहे. अत्यंत अवश्यक काम असेल तरच पुढे जाऊ दिले जात आहे. सकाळी ११ वाजेपर्यंत शहरातील गांधी पार्क, कडबी मंडी येथील भाजीपाला मार्केट सुरु होते. तसेच वसमत रस्त्यावरील काळी कमान येथील भाजीपाला मार्केटमध्ये मोठी गर्दी होती. त्यामुळे पोलिसांनी या ठिकाणी भाजीपाला विक्री बंद केली. सकाळी ११ नंतर काळी कमान येथील भाजीपाल विक्रेत्यांना घरी जाण्यास भाग पाडले. तसेच गांधी पार्क परिसरात देखील रस्त्यावर फिरणे बंद केले. सकाळी १०.३० वाजता देशमुख हॉटेल परिसरात फिरणाऱ्यांना मोंढा पोलिसांनी चांगलाच चोप दिला. पोलिस आता मारत असल्याचे कळताच काही वेळातच  काही वेळात शहरात शुकशुकाट पसरला.

तहसिलदारांनी हाती घेतली काठी
काही लोक शहरातील मुख्य रस्त्यावरून उगाच रपेट मारत असल्याचे चित्र सकाळी ११ वाजेपर्यंत होते. कोणी दुचाकीवर, सायकल आणि मोटारीतून फिरताना आढळुन आले. त्यामुळे परभणीचे तहसिलदार विद्याचरण कडवकर यांनी जिंतुर रस्त्यावर उभे राहत हातात काठी घेत नियम न पाळणाऱ्यांना झोडपुन काढले. त्यामुळे काही वेळातच जिंतुर रस्त्यावर सन्नाटा पसरला.